मुंबई, 18 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाचं बिगुल अखेर वाजणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट चाहते वाट पाहत असलेली स्पर्धा अगदी 24 तासांत सुरू होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) यांच्यात शेख जैयाद क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्याआधी दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सचे संघ कसा असेल, याबाबत सांगितले.
आतापर्यंत 4 वेळा चॅम्पियन झालेल्या रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई संघ पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्यासाठी सज्ज आहे. मुंबई संघात कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या (hardik Pandya), केरन पोलार्ड, ख्रिस लिन, जसप्रीत बुमराह सारखे स्टार खेळाडू आहेत. मात्र सुनील गावस्कर यांच्या मते संघाची एक बाजू अजूनही कमकुवतच आहे.
वाचा-कोरोनामुळे IPL मध्ये होणार मोठा बदल! असे असतील 8 नियम
सुनिल गावस्कर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची सलामीचे फलंदाज म्हणून निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची नेमणूक केली आहे. तर चौथ्या क्रमांकावर युवा खेळाडू इशान किशन. पाचव्या क्रमांकासाठी हार्दिक पांड्या आणि सहाव्या क्रमांकासाठी केरन पोलार्ड. मात्र सुनील गावस्कर यांनी निवडलेल्या संघात मुंबईकर धवल कुलकर्णी या गोलंदाजाला जागा दिली नाही आहे. धवल कुलकर्णी याआधी राजस्थान संघाकडून खेळत होता, मात्र यंदाच्या लिलावात धवल कुलकर्णीला मुंबईने विकत घेतले.
वाचा-'हा' संघ आहे बुकींचा फेव्हरेट! वाचा कोणत्या संघावर आहे कितीचा सट्टा
मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलचा प्रबळ दावेदार असला तरी, संघातील एक कमकुवत बाजू सुनील गावस्कर यांनी यावेळी सांगितली. गावस्कर यांच्या मते, मुंबई संघासाठी चिंतेची बाब आहे फिरकी गोलंदाज. संघात राहुल चाहर आणि कृणाल पांड्या सारखे फिरकी गोलंदाज असले तरी अनुभवी गोलंदाज नाही आहेत. संघात जयंत यादव आणि अनुकूल रॉय सारखे युवा खेळाडूही आहेत. त्यामुळे अनुभवी गोलंदाज नसल्यामुळे फिरकी गोलंदाजी कमकुवत दिसत आहे.
वाचा-रोहित शर्माची चिंता वाढली, मुंबई इंडियन्सची 'ही' बाजू अजूनही कमकुवतच
सुनील गावस्कर यांनी निवडलेला मुंबईचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, केरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कूल्टर नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट / मिचेल मॅक्ग्लेघन, जसप्रीत बुमराह.
मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्ग्लेघन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, प्रिंस बलवंत राय सिंह, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, जयंत यादव, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कूल्टन नाइल, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, जेम्स पॅटिंसन.