Home /News /sport /

IPL 2020: युएइमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज नाही तर 'या' संघाचा दबदबा! असा आहे मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड

IPL 2020: युएइमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज नाही तर 'या' संघाचा दबदबा! असा आहे मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड

चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघ यावेळी पाचव्यांदा चॅम्पियन होण्यास सज्ज आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला या पाच फलंदाजांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघ यावेळी पाचव्यांदा चॅम्पियन होण्यास सज्ज आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला या पाच फलंदाजांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) या दोन संघाचा असा आहे युएइमधला रेकॉर्ड.

    नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: आयपीएलच्या (IPL 2020) 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र कोरोनाव्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित झाली. दरम्यान, आता बीसीसीआयच्या वतीने ही स्पर्धा युएइमध्ये आयोजित केली जाणार आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या 13व्या हंगामाची सुरुवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल 2020 ही स्पर्धा भारताबाहेर होणार असल्यामुळे संघाची आणि खेळाडूंची समीकरणं बदलणार आहे. या स्पर्धेचे सामने शारजाह आणि दुबईमध्ये ओयोजित केले जाणार आहेत. याआधी 2014 मध्ये आयपीएलचे निम्मे सामने युएईमध्येच घेण्यात आले होते आणि भारतीय चाहत्यांनी त्याचा प्रचंड आनंद लुटला होता. युएईमध्ये आयपीएल येऊ शकेल अशी बातमी येताच तेथील क्रिकेट असोसिएशनने तयारी सुरू केली. दुबई स्पोर्ट्स सिटीचे क्रिकेट इव्हेंटचे प्रमुख सलमान हनीफ म्हणाले की, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि आयसीसी अॅकॅडमी असलेले दुबई स्पोर्ट्स सिटी सामन्यांसाठी सज्ज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 खेळपट्ट्या आहेत, द्या, ज्यामुळे येथे खेळपट्टी तयार करण्यात कोणतीही अडचण नाही. वाचा-14 दिवसांत खेळाडूंना कराव्या लागणार 4 कोव्हिड टेस्ट, असे असणार IPL 2020चे नियम असा आहे संघाचा रेकॉर्ड मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) हे दोन संघ आयपीएलमधील सर्वात मजबूत संघ मानले जातात. मुंबईने चारवेळा तर चेन्नईने तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, युएईमध्ये या दोन्ही संघाचा रेकॉर्ड विशेष चांगला नाही आहे. 2014मध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं स्पर्धा जिंकली होती. मात्र यएइमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाचे वर्चस्व होते. या संघाने आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकले नसले तरी, युएइमध्ये त्यांचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. वाचा-IPL 2020 वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता ‘या’ तारखांना होणार सामने वाचा-पाचव्यांदा आयपीएल जिंकण्यास पलटन सज्ज! मुंबईचे 'या' प्रमुख खेळाडूंवर असणार मदार पंजाब संघाने युएइमध्ये जिंकले सर्व सामने 2014मध्ये आयपीएलमध्ये सहभागी 8 संघांमध्ये युएइत 5-5 सामने खेळले गेले होते. यात सर्वात चांगले प्रदर्शन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे होते. युएइमध्ये पंजाब संघाने एकही सामना गमावला नाही, त्यांनी पाचही सामने जिंकले. तर, चेन्नईने 5 पैकी 4 सामने जिंकले. राजस्थान संघाने 3 जिंकले तर 5 गमावले. केकेआर, आरसीबी आणि हैदराबाद संघाने 2 सामने जिंकले तर 3 गमावले. मात्र आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई संघाने युएइमध्ये एकही सामना जिंकला नव्हता. मुंबई इंडियन्स संघाने पाच पैकी पाचही सामने गमावले होते. मात्र चांगल्या खेळी करूनही पंजाब संघ आयपीएल जिंकू शकला नाही. पंजाब आणि कोलकाता यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता संघाने पंजाबला 3 विकेटनं हरवत ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Mumbai Indians

    पुढील बातम्या