स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 MI vs CSK: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्ज सामना LIVE?

IPL 2020 MI vs CSK: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्ज सामना LIVE?

मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचा किताब मिळवला आहे. तर, CSKने 2010, 2011 आणि 2018मध्ये आयपीएलचा किताब मिळवला आहे.

  • Share this:

अबू धाबी, 19 सप्टेंबर : गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. आजपासून आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला सुरुवात होईल. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (chennai superkings) यांच्यात होणार आहे. यंदा युएइमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहेत. दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये सामने होणार आहेत. सर्वात जास्त 24 सामने दुबईमध्ये, 20 सामने अबू धाबीमध्ये आणि 12 सामने शारजाहमध्ये होतील.

हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात यशस्वी संघ आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली संघानं चार वेळा आयपीएलचा किताब मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचा किताब मिळवला आहे. तर, दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 3 वेळा आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. CSKने 2010, 2011 आणि 2018मध्ये आयपीएलचा किताब मिळवला आहे.

वाचा-Disney Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं

कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (chennai superkings) IPL 2020 चा पहिला सामना आज शेख जायद स्टेडियम, अबू धाबीमध्ये खेळवला जाणार आहे.

किती वाजता सुरू होणार सामना ?

भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. याआधी 7 वाजता टॉस होईल.

येथे पाहा सामन्याचा LIVE टेलिकास्ट

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (star sports network) वर पाहता येणार आहे.

येथे पाहू शकता ऑनलाईन

जर तुम्हाला ऑनलाइन सामना पाहायचा असल्याच तुम्ही डिज्नी हॉटस्टार अॅपवर (Disney Hotstar VIP) पाहू शकता.

आकड्यांमध्ये मुंबई चेन्नईवर भारी

मुंबई इंडियन्सचा संघ कायमच चेन्नईवर भारी पडला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने झाले आहेत. त्यापैकी 18 सामने मुंबईने तर 12 चेन्नईने जिंकले आहेत. मात्र गेल्या 7 वर्षात मुंबई इंडियन्सला एकदाही आपला पहिला सामना जिंकण्यात यश आले नाही आहे. मात्र मुंबईने 10 पैकी 8 अंतिम सामन्यात चेन्नईला हरवले आहे.

वाचा-फिर से माही मारेगा! तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी

मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्‍ग्‍लेघन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्‍ट, मोहसिन खान, प्रिंस बलवंत राय सिंह, दिग्‍विजय देशमुख, हार्दिक पांड्या, जयंत यादव, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कूल्‍टन नाइल, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्‍य तारे, जेम्‍स पॅटिंसन.

चेन्नईचा संघ: शेन वॉट्सन, फाफ ड्युप्लेसिस, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केदार जाधव, रविंद्र जडेजा. ड्वेन ब्राव्हो, मिशेल सॅटनर, इमरान ताहीर, दीपक चाहर, पियूष चावला. शार्दूल ठाकूर, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, नारायण जगदेशन, मोनू कुमार, सॅम कुरन, कर्ण शर्मा, आर साई किशोर, केएल असीफ, लुंगी नग्धी, जोश हेजलवूड

Published by: Priyanka Gawde
First published: September 19, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या