मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ठरलं! 'या' तारखेपासून होणार IPL 2020ला सुरुवात, अशा असणार सामन्यांच्या वेळा

ठरलं! 'या' तारखेपासून होणार IPL 2020ला सुरुवात, अशा असणार सामन्यांच्या वेळा

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. 4 वेळा त्यांना आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले आहे. मात्र या हंगामात मुंबईच्या खेळाडूंची दुखापत त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. 4 वेळा त्यांना आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले आहे. मात्र या हंगामात मुंबईच्या खेळाडूंची दुखापत त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

IPL कौन्सिल चेअरमन ब्रीजेश पटेल ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केला. यादरम्यान 60 सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

    नवी दिल्ली, 23 जुलै : आशिया कप (Asia Cup) आणि टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) स्पर्धा रद्द झाल्यानंतर आता आयपीएल 2020चा ( IPL 2020) मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएल 2020ची स्पर्धा भारतात नाही तर यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होऊ शकते, अद्याप तारखेबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होऊ शकते. बीसीसीआयच्या वतीन सध्या 19 सप्टेंबर आणि 26 डिसेंबर अशा दोन वेळा ठरवल्या आहेत. यानुसार आयपीएल स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे. कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. IPL कौन्सिल चेअरमन ब्रीजेश पटेल ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केला. यादरम्यान 60 सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे. पटेल पुढे म्हणाले की – अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. सरकारच्या परवानगीनंतर लीगचा संपूर्ण प्लान आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. वाचा-IPL 2020 : या देशात IPL चे सामने रंगणार; केवळ एका गोष्टीची प्रतीक्षा किती वाजता सुरू होणार आयपीएलचे सामने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2020चे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू केले जाऊ शकतात. भारतीय वेळेनुसार हे सामने 8 वाजता सुरू होतील, तर 7.30 वाजता टॉस होईल. याआधी काही सामने दुपारी 4 वाजताही आयोजित करण्यात येत होते, मात्र यंदा युएईमध्ये ही स्पर्धा होत असल्याचे सर्व सामने 8 वाजताच खेऴवले जातील. वाचा-T20 World Cup 2020: क्रिकेट विश्वातील मोठी बातमी; कोरोनामुळे सामना लांबणीवर युएईने सुरू केली आयपीएलच्या आयोजनाची तयारी युएईमध्ये आयपीएल येऊ शकेल अशी बातमी येताच तेथील क्रिकेट असोसिएशनने तयारी सुरू केली. दुबई स्पोर्ट्स सिटीचे क्रिकेट इव्हेंटचे प्रमुख सलमान हनीफ म्हणाले की, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि आयसीसी अॅकॅडमी असलेले दुबई स्पोर्ट्स सिटी सामन्यांसाठी सज्ज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 खेळपट्ट्या आहेत, द्या, ज्यामुळे येथे खेळपट्टी तयार करण्यात कोणतीही अडचण नाही. याआधी 2014 मध्ये आयपीएलचे निम्मे सामने युएईमध्येच घेण्यात आले होते आणि भारतीय चाहत्यांनी त्याचा प्रचंड आनंद लुटला होता. याशिवाय 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन केले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआय आणि ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी ही चांगली बातमी आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: BCCI, Sourav ganguly

    पुढील बातम्या