स्पोर्ट्स

  • associate partner

स्पर्धेदरम्यान खेळाडूला कोरोना झाल्यास रद्द होणार IPL? असा आहे BCCIचा नियम

स्पर्धेदरम्यान खेळाडूला कोरोना झाल्यास रद्द होणार IPL? असा आहे BCCIचा नियम

कोरोनाच्या काळात ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असली तरी खेळाडूंना नियम पाळावे लागण आहे. यासाठी बीसीसीआयनं यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : भारतात दरवर्षी आयपीएल (IPL) ही स्पर्धा एखाद्या उत्सवाप्रमाणे आयोजित केली जाते. जगभरातील टॉप खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. मात्र यावर्षी 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित करण्यात आली होती. आता बीसीसीआयनं ही स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 19 सप्टेंबरपासून युएइमध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. मात्र कोरोनाच्या काळात ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असली तरी खेळाडूंना नियम पाळावे लागण आहे. यासाठी बीसीसीआयनं यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार केली आहे.

वाचा-पगारातही CSKच्या खेळाडूंचा दबदबा, एका हंगामासाठी घेतात इतके कोटी

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यास काय होणार?

आयपीएलच्या SOPनुसार एखादा खेळाडू स्पर्धेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळ्यास स्पर्धा रद्द केली जाणार आहे. जर खेळाडूमध्ये कोरोनाची हलकी लक्षणं असतील तर त्याला रुग्णालयात दाखल केले जाईल. दोन आठवड्यात पुन्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात येईल. या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूला पुन्हा स्पर्धेत खेळता येईल.

वाचा-पीपीई सूट घालून एअरपोर्टवरच नाचू लागली चहलची होणारी बायको; धनश्रीचा VIDEO VIRAL

तब्बल सहावेळा होणार खेळाडूंची कोरोना चाचणी

बीसीसीआयनं जाहीर केलेल्या नियमांनुसार खेळाडूंची सहावेळा कोरोना चाचणी होणार आहे. संघ 20 ऑगस्टनंतर युएइ जाण्यास सुरुवात करतील. 23 ऑगस्टपर्यंत सर्व संघांना युएइमध्ये पोहचावे लागणार आहे. संघातील विदेशी खेळाडू थेट युएइमध्ये भेटतील. तर, भारतीय खेळाडूंची युएइ जाण्याआधी दोनवेळा कोरोना चाचणी होणार आहे. त्यानंतर एअरपोर्टवर खेळाडूंचे तापमान तपासले जाणार आहे. हॉटेलमध्ये खेळा़डूंना 7 दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. सात दिवसात तीन वेळा कोरोना चाचणी होईल. खेळाडूंना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर बायो सेक्यूर बबलमध्ये जाण्याची परवानगी मिळेल.

Published by: Priyanka Gawde
First published: August 14, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या