स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता ‘या’ तारखांना होणार सामने

IPL 2020 वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता ‘या’ तारखांना होणार सामने

बीसीसीआयच्या वतीने यावर्षीची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 19 सप्टेंबर होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै : कोरोनामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या असताना आता पुन्हा क्रिकेट सामन्यांना सुरुवात होत आहेत. मात्र यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मात्र आयसीसीच्या वतीने स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल 2020 (IPL 2020) स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या वतीने यावर्षीची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 19 सप्टेंबर होणार आहे. याआधी आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र या तारखेत बदल झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य म्हणजे भारतीय संघाला आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दौरा करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा सुरू 19 सप्टेंबरपासूनच होणार आहे. यात कोणताही बदल झालेला नाही आहे. फक्त अंतिम सामना 8 नोव्हेंबर ऐवजी 10 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे याआधी 51 दिवसांसाठी होणारी ही स्पर्धा आता 53 दिवस चालणार आहे. याबाबत अंतिम निर्णय 2 ऑगस्टला होणार आहे. 2 ऑगस्टला आयपीएल गर्व्हनिंगची बैठक होणार आहे.

वाचा-युएईमध्ये बदलणार विराटचं नशीब? ‘हे’ 3 खेळाडू पहिल्यांदाच संघाला करणार चॅम्पियन

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, तारखांमध्ये बदलचा निर्णय आयपीएलच्या बैठकीत होईल. मात्र दिवाळीच्या काळात आयपीएलचे सामने व्हावे, अशी मागणी स्टार स्पोर्ट्सच्या वतीने करण्यात आली होती. यावर्षी 14 नोव्हेंबरला दिवाळी असून त्या आसपास तारीख असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाचा-पाचव्यांदा आयपीएल जिंकण्यास पलटन सज्ज! मुंबईचे 'या' प्रमुख खेळाडूंवर असणार मदार

किती वाजता सुरू होणार आयपीएलचे सामने

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2020चे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू केले जाऊ शकतात. भारतीय वेळेनुसार हे सामने 8 वाजता सुरू होतील, तर 7.30 वाजता टॉस होईल. याआधी काही सामने दुपारी 4 वाजताही आयोजित करण्यात येत होते, मात्र यंदा युएईमध्ये ही स्पर्धा होत असल्याचे सर्व सामने 8 वाजताच खेऴवले जातील.

वाचा-#BREAKING क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, IPL च्या अधिकृत तारखा जाहीर

युएईने सुरू केली आयपीएलच्या आयोजनाची तयारी

युएईमध्ये आयपीएल येऊ शकेल अशी बातमी येताच तेथील क्रिकेट असोसिएशनने तयारी सुरू केली. दुबई स्पोर्ट्स सिटीचे क्रिकेट इव्हेंटचे प्रमुख सलमान हनीफ म्हणाले की, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि आयसीसी अॅकॅडमी असलेले दुबई स्पोर्ट्स सिटी सामन्यांसाठी सज्ज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 खेळपट्ट्या आहेत, द्या, ज्यामुळे येथे खेळपट्टी तयार करण्यात कोणतीही अडचण नाही. याआधी 2014 मध्ये आयपीएलचे निम्मे सामने युएईमध्येच घेण्यात आले होते आणि भारतीय चाहत्यांनी त्याचा प्रचंड आनंद लुटला होता. याशिवाय 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन केले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआय आणि ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी ही चांगली बातमी आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 30, 2020, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading