मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटला मोठा झटका, सुरैश रैनानंतर आता RCBच्या गोलंदाजानं घेतली IPLमधून माघार

विराटला मोठा झटका, सुरैश रैनानंतर आता RCBच्या गोलंदाजानं घेतली IPLमधून माघार

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होऊन चारच दिवस झाले आहेत. मात्र चार दिवसातच षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होऊन चारच दिवस झाले आहेत. मात्र चार दिवसातच षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघातील गोलंदाजानंही आयपीएलमधून माघार घेतली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) 13व्या हंगामाची सुरूवात होण्यासाठी 3 आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. यातच चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तर CSKचा फलंदाज सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेऊन भारतात परतला आहे. यातच आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघातील गोलंदाजानंही आयपीएलमधून माघार घेतली आहे. RCBचा स्टार गोलंदाज केन रिचर्ड्सननं (kane Richardson) आयपीएलच्या या हंगामातून माघार घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे रिचर्ड्सन आयपीएलचा तेरावा हंगाम खेळणार नाही आहे. RCB संघानं त्यानंतर ट्वीट करत सांगितले की रिचर्ड्सन बाबा होणार असून, त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे त्याने माघार घेतली आहे. आता रिचर्ड्सनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम जम्पा RCB संघात सामिल होणार आहे. वाचा-चेन्नई सुपरकिंग्जनंतर आता आणखी एका 'टीम'मधील सदस्य पॉझिटिव्ह
वाचा-धोनीसोबत झालेल्या वादामुळे सुरैश रैना IPL सोडून भारतात परतला? 2016 पासून RCB मध्ये आहे रिचर्ड्सन 28 वर्षीय रिचर्ड्सन 2016 पासून RCB संघात आहे. 2020मध्ये लिलावात RCB ने पुन्हा त्याला 4 कोटींना विकत घेतेल. तर अॅडम जम्पाला लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. रिसर्ड्सननं माघार घेतल्यानंतर अॅडम जम्पाला बेस प्राइज 1.5 कोटींवर विकत घेतले आहे. जम्पामुळे संघात आणखी एक चांगला फिरकी गोलंदाजाचा समावेश झाला आहे. वाचा-'कुटुंबासोबत असताना मास्क वापरत नाही', कोरोना पॉझिटिव्ह CSK खेळाडूचे चॅट VIRAL ओपनिंग मॅच खेळू शकते RCB दुसरीकडे अद्याप बीसीसीआयनं आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही आहे. त्यामुळे RCB आणि मुंबई इंडियन्स यांच्यत 19 सप्टेंबर 2020 रोजी पहिला सामना होऊ शकतो. याआधी सीएसके आणि मुंबईमध्ये सामना होणार होता, मात्र सीएसकेचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांनी ओपनिंग सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयला वेळापत्रक जाहीर करण्यासाठी वेळ लागत आहे.
First published:

Tags: RCB, Virat kohli

पुढील बातम्या