नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला सुरुवात होऊन एक आठवड्यांचा कालावधी झाला आहे. सर्व संघांनी एक-एक सामने खेळले असून हैदराबाद वघळता सर्व संघानी एक-एक सामना जिंकलाही आहे. मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात एक भलताच प्रकार दिसून आला. सर्व संघाचे कर्णधार फलंदाज किंवा गोलंदाजाला नाही तर टॉसला घाबरत आहेत.
क्रिकेटमध्ये टॉस खुप महत्त्वाचा असतो. टॉस जिंकला की मॅच जिंकता येते असे मानले जाते. मात्र आयपीएल 2020 वेगळाच प्रकार दिसून येत आहे. आतापर्यंत ज्या कर्णधारांनी टॉस जिंकले आहेत, त्यांनी सामने गमावले आहे. हे आम्ही नाही आकडे सांगत आहेत. आता परिस्थिती अशी झाली आहे की, कर्णधार टॉस जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी प्रार्थना करत आहे. गेल्या सात सामन्यात पहिल्यांदा टॉस जिंकणारा संघाने सामना गमावला आहे.
वाचा-'मोदीजी आता तुम्हीच समजवा', धोनीच्या निर्णयावर सेहवागनं PMकडे मागितली मदत
टॉस हरा मॅच जिंका!
आयपीएलचा पहिला सामना सोडल्यास प्रत्येक सामन्यात टॉस कर्णधारासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत 8 पैकी 7 सामन्यात ज्या संघांनी टॉस जिंकले आहेत, त्यांनी सामना गमावला आहे. टॉस गमावण्याच्या या फेरीत कर्णधार धोनीपासून विराट कोहली, केएल राहुल आणि डेव्हिड वॉर्नर सारखे सर्व कर्णधार अडकले आहेत. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनीनं टॉस जिंकला होता आणि मॅचही. मात्र त्यानंतर टॉस जिंकणारा संघ सामना हरत आहे.
वाचा-विराटचा पत्ता होणार कट, गंभीरनं सांगितलं कोण होणार टीम इंडियाचा पुढचा कर्णधार!
चेस करणं झालं आहे कठिण
आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 सामने झाले आहे, ज्यापैकी 6 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. 20 सप्टेंबरला दिल्लीने पंजाबला सुपरओव्हरमध्ये हरवले होते. य़ा सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी केली होती. आयपीएलचा तिसरा सामना बंगळुरूनं 10 धावांनी जिंकला होता. तर चौथा सामना राजस्थाननं 16 धावांनी. दोन्ही सामन्यात विजयी संघानी फलंदाजी केली होती. काल झालेल्या हैदराबाद विरुद्ध कोलकाता संघात मात्र वेगळा प्रकार घडला. कोलकातानं चेस करत हा सामना जिंकला.