स्पोर्ट्स

  • associate partner

IPLमध्ये ‘हा’ गोलंदाज आहे सर्वात कंजूस! पाहा उत्तम इकॉनॉमी रेट असलेले टॉप 5 गोलंदाज

IPLमध्ये ‘हा’ गोलंदाज आहे सर्वात कंजूस! पाहा उत्तम इकॉनॉमी रेट असलेले टॉप 5 गोलंदाज

टाका नजर IPLमध्ये कोणते असे गोलंदाज आहेत ज्यांनी सर्वात कमी धावा दिल्या आहेत. टॉपवर भारतीय नाहीतर हा विदेशी गोलंदाज आहे.

  • Share this:

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले असून प्लेऑफमधील चार संघ लवकरच स्पष्ट होतील. या स्पर्धेत अनेक प्रतिभावान खेळाडू समोर आले असून आपल्या शानदार बॉलिंगच्या जोरावर त्यांनी संघासाठी विजय खेचून आणले आहेत. यामध्ये आपल्या शानदार इकॉनॉमी रेटच्या जोरावर त्यांनी फलंदाजांना त्रस्त केले आहे. आज आपण अशाच काही उत्तम इकॉनॉमी रेट असणाऱ्या बॉलर्सच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत.

1) राशिद खान

सनरायजर्स हैदराबादचा सर्वांत यशस्वी गोलंदाज असलेल्या राशिद खान याने सर्वांत शानदार गोलंदाजी केली आहे. या मोसमात आपल्या संघासाठी शानदार कामगिरी करत काही सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. बेस्ट इकॉनॉमी असणाऱ्या बॉलर्सच्या यादीत तो सर्वात वर असून या मोसमात त्याने 52 ओव्हरमध्ये केवळ 264 रन दिले आहेत. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट हा केवळ 5.07 इतका आहे.

2) वॉशिंग्टन सुंदर

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्पिनर या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. या मोसमात त्याने आपल्या शानदार इकॉनॉमी रेटच्या बळावर संघासाठी अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. या मोसमात त्याने 44 ओव्हरमध्ये केवळ 253 धावा दिल्या आहेत. तसेच यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट हा 5.75 इतका आहे.

3) मोहम्मद नबी

या मोसमात मोहम्मद नबी याने केवळ एक सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने चार ओव्हरमध्ये केवळ 23 धावा दिल्या होत्या. यामध्ये त्याचा रनरेट केवळ 5.75 इतका आहे.

4) जयंत यादव

या मोसमात जयंत यादवनेदेखील केवळ एक सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने तीन ओव्हरमध्ये केवळ 18 धावा दिल्या होत्या. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 6 इतका आहे.

5) अक्षर पटेल

दिल्ली कॅपिटल्सच्या या स्पिनरने या मोसमात आपल्या संघासाठी शानदार कामगिरी करत संघाला प्लेऑफच्या जवळ नेऊन ठेवले आहे. या मोसमात त्याने 11 सामने खेळले असून यामध्ये 36 ओव्हर टाकल्या आहेत. यात त्याने केवळ 221 रन दिले असून त्याचा इकॉनॉमी रेट हा केवळ 6.13 इतका आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 3, 2020, 7:38 AM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या