नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : आयपीएलचा (IPL) तेरावा हंगाम आता 19 सप्टेंबरपासून युएमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र हंगामाआधीच बीसीसीआयनं चिनी कंपनी वीवोकडून (Vivo) मुख्य प्रायोजकत्व काढून घेतले होते. त्यामुळं आयपीएलसाठी नवीन प्रयोजक आता बीबीसीआयनं शोधले आहे. आयपीएल 2020 चे टायटल स्पॉन्सरशिप ड्रीम 11 (Dream 11) या कंपनीला 222 कोटींना मिळाले आहे, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली.
चिनी कंपन्यांवर सरकारनं बंदी घातल्यानंतर बीसीसीआयने विवोबरोबरचा करार संपविण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये, विवो इंडियाने 2199 कोटी रुपयांमध्ये आयपीएल टायटल प्रायोजकत्व अधिकार संपादन केले होते. करारानुसार कंपनीला प्रत्येक हंगामात बीसीसीआयला सुमारे 440 कोटी रुपये द्यावे लागले. आता ड्रीम 11 कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व 222 कोटी रुपयांना देण्यात आले आहे.
Fantasy sports platform Dream11 wins IPL title sponsorship rights with a bid of Rs 222 crore: IPL Chairman Brijesh Patel to PTI
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2020
पतंजलीही होती शर्यतीत
मीडिया रिपोर्टनुसार, बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली (Patanjali) आयपीएल मुख्य प्रायोजकसाठी बोली लावणार असे वृत्त होते. पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजरवाला यांनी सांगितले की, "आम्हाला पतंजली हा जागतिक ब्रँड बनवायचा आहे आणि म्हणूनच आम्ही आयपीएल प्रायोजकत्वाबद्दल विचार करीत आहोत", असे सांगितले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.