नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला म्हणजेच आयपीएलला (IPL 2020) उद्यापासून सुरूवात होणार आहे. मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला एक मोठा झटका बसला आहे. राजस्थान संघाचा पहिला सामना 22 सप्टेंबरला चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाविरुद्ध होणार आहे. मात्र त्याआधी राजस्थान संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) पहिला सामना खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. स्मिथला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती, त्यामुळे स्मिथ आयपीएल खेळणार की नाही, यावरून संभ्रम आहे. मात्र संघ व्यवस्थापनाला अशा विश्वास आहे की, पहिल्या मॅच आधी स्मिथ फिट होईल.
क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार, स्मिथ युएई पोहचला आहे. त्याच्या तब्येतीवर सध्या नजर ठेवली जात आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत स्मिथच्या डोक्याला मार लागला होता. ऑस्ट्रेलियामध्ये कनकशनचे (concussion) नियम कडक आहे.
वाचा-सलग चारवेळा दहावीत झाला होता नापास, आता IPL गाजवण्यासाठी सज्ज!
या नियमानुसार खेळाडूला पुर्णत: फिट झाल्याशिवाय खेळण्याची परवानगी नसते. युएइमध्ये राजस्थान संघाचे कोच अॅंड्र्यू मॅकडोनल्ड स्मिथवर लक्ष ठेवून आहे. गेल्या वर्षी अॅशेज मालिकेदरम्यानही स्मिथला अशाच प्रकारचा त्रास झाला होता.
वाचा-'तो चुकीच्या खेळाडूंना पाठिंबा द्यायचा', माजी प्रशिक्षकाचा विराटवर आरोप
सराव करताना झाला जखमी
काही दिवसांपूर्वी सराव करत असताना स्मिथच्या डोक्याला मार लागला. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी कोचिंग स्टाफने टाकलेला चेंडू स्मिथच्या डोक्याला लागला. त्यानंतर स्मिथ कनकशन टेस्ट पासही झाला होता. मात्र असे असले तरी तो पहिला सामना खेळणार की नाही? याबाबत संभ्रम कायम आहे.