10 वर्ष क्रिकेट खेळूनही 'या' मुंबईकर फलंदाजाला मिळाली नाही टीम इंडियात जागा! IPLमुळे मिळणार संधी

10 वर्ष क्रिकेट खेळूनही 'या' मुंबईकर फलंदाजाला मिळाली नाही टीम इंडियात जागा! IPLमुळे मिळणार संधी

मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळणारा हा मुंबईकर खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात करू शकतो भारताकडून पदार्पण.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : आयपीएलचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएल संपल्यानंतर भारता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. मात्र मुंबईचा असा एक खेळाडू आहे, जो आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही आहे. हा खेळाडू आहे सूर्यकुमार यादव.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनं या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. सूर्यकुमारनं 11 सामन्यात 283 धावा केल्या आहेत. या हंगामात 79 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. आतापर्यंत सूर्यकुमारनं 2 अर्धशतक लगावले आहेत. सूर्यकुमार मधल्या फळीचा उत्तम फलंदाज आहे, मात्र त्याला भारतीय संघात जागा मिळाली नाही. दरम्यान डिसेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमारच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

वाचा-...म्हणून मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर स्टोक्सनं दुमडलं मधलं बोट!

सध्या आयपीएलमध्ये केएल राहुल चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे भारतीय संघात त्याची निवड पक्की आहे. तर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांनाही संधी मिळू शकते. त्यामुळे सूर्यकुमारला जागा दिल्यास त्याला फलंदाजासाठी कोणत्या क्रमांकावर उतरवणार हा प्रश्न कायम असेल.

वाचा-हा तर पोलार्डचा भाऊ! आर्चरनं घेतला जबरदस्त कॅच, मैदानावरील सर्व खेळाडू शॉक

सूर्यकुमारनं स्थानिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2012मध्ये त्याची भारतीय संघ निवड होणार होती, मात्र त्याला जागा मिळाली नाही. 2019मध्ये न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारत अ संघात त्याची निवड झाली होती. मात्र भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी सूर्यकुमार धडपडत आहे.

वाचा-IPL 2020 : आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकाची घोषणा

भारतीय संघ 3 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 4 कोसीट सामने त्याचबरोबर एकदिवसीय आणि टी-20 मालिकाही खेळल्या जाणार आहे. येत्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

Published by: Priyanka Gawde
First published: October 27, 2020, 7:44 AM IST

ताज्या बातम्या