स्पोर्ट्स

  • associate partner

SH vs RCB Live Streaming: पहिल्या विजयासाठी कॅप्टन कोहली सज्ज! येथे पाहा बंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामना LIVE

SH vs RCB Live Streaming: पहिल्या विजयासाठी कॅप्टन कोहली सज्ज! येथे पाहा बंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामना LIVE

गेल्या 12 वर्षात विराटला एकदाही आयपीएलचा किताब मिळवता आला नाही आहे, तर हैदराबादनं एकदा विजय मिळवला आहे.

  • Share this:

दुबई, 21 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामातील तिसरा सामना आज होणार आहे. हा सामना डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे. गेल्या 12 वर्षात विराटला एकदाही आयपीएलचा किताब मिळवता आला नाही आहे, तर हैदराबादनं एकदा विजय मिळवला आहे. बंगळुरूकडे कोहली , एबी डिव्हिलियर्ससह अनेक विस्फोटक फलंदाज आहे तर, सनरायजर्सकडे दर्जेदार गोलंदाज आहेत.

कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

किती वाजता सुरू होणार सामना ?

भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. याआधी 7 वाजता टॉस होईल.

येथे पाहा सामन्याचा LIVE टेलिकास्ट

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (star sports network) वर पाहता येणार आहे.

येथे पाहू शकता ऑनलाईन

जर तुम्हाला ऑनलाइन सामना पाहायचा असल्याच तुम्ही डिज्नी हॉटस्टार अॅपवर (Disney Hotstar VIP) पाहू शकता.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टॉ, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रिध्दिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नाबी, राशिद खान, मिशेल मार्श, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फेबियन अॅलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन, बासिल थम्पी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : अॅरॉन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, एडम जाम्पा, इसुरू उडाना, मोईन अली, जोश फिलीप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading