IPL 2020 SRH vs RCB LIVE: विराटचा विजयी शुभारंभ! बंगळुरूनं 10 धावांनी जिंकला सामना

IPL 2020 SRH vs RCB LIVE: विराटचा विजयी शुभारंभ! बंगळुरूनं 10 धावांनी जिंकला सामना

बंगळुरूनं दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो (61) वगळता इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही.

  • Share this:

दुबई, 21 सप्टेंबर : सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal challengers banglore) या सामन्यात बंगळूनं 10 धावांनी विजय मिळवला. बंगळुरूनं दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो (61) वगळता इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. परिणामी हैदराबादचा संघ 153 धावांवर ऑलआऊट झाला. बंगळुरूकडून युझवेंद्र चहलनं 4 ओव्हरमध्ये 18 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, नवदीप सैनी एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. तर, शिवम दुबेनंही दोन विकेट घेतल्या.

बंगळुरूनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली आहे. वॉर्नर बेअरस्टोनं मारलेला चेंडू स्टम्पला लागल्यामुळे बाद झाला. त्यांनतर बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी 71 धावांची भागीदारी केली. मात्र मनीष पांडे 33 चेंडूत 34 धावा करत बाद झाला. तर, चहलनं एकाच ओव्हरमध्ये बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडलं. त्यानंतर हैदराबादचा डाव गडगडला.

तर, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूनं 163 धावांचे आव्हान हैदराबादला दिले. एबीनं 29 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र एबी 19व्या ओव्हरमध्ये रन आऊट झाला, भुवनेश्वर कुमारनं अखेरच्या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा दिल्या. तर, RCB कडून फिंच आणि युवा देवदत्त पड्डीकल (Devdutt padikkal) यांनी सलामीला आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली. युवा फलंदाज देवदत्तनं पहिल्याच सामन्यात 56 धावांची खेळी केली.

मात्र विजय शकंरच्या 12व्या ओव्हरमध्ये देवदत्तला बोल्ड केले. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये फिंचही 29 धावा करत बाद झाला. मैदानावर सर्वात खतरनाक कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची जोडी होती. मात्र दोघांना मोठी भागीदारी करता आली नाही. युवा गोलंदाज नटराजननं 14 धावांवर कोहलीला मागे धाडलं. हैदराबादकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि टी नटराजनन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्ट्रो, मनीष पांडे, विजय शंकर, मिशेल मार्श, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, रशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : अॅरॉन फिंच, देवदत्त पल्लीकड, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, जॉश फिलीप (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 7:02 PM IST
Tags: RCBSRH

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading