Home /News /sport /

IPL 2020 SRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना

IPL 2020 SRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना

गिल आणि मॉर्गन यांनी 90 धावांची भागीदारी केली. हैदराबादनं दिलेल्या 143 धावांचे आव्हान कोलकातानं 12 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

    अबू धाबी, 26 सप्टेंबर : कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers hyderabad) या सामन्यात कोलकातानं एकहाती सांमना जिंकला. युवा फलंदाज शुभमन गिलनं 70 धावांची आक्रमक खेळी केली. गिलनं 62 चेंडूत 70 धावा केल्या. गिल आणि मॉर्गन यांनी 90 धावांची भागीदारी केली. हैदराबादनं दिलेल्या 143 धावांचे आव्हान कोलकातानं 12 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यासह हैदराबादनं सलग दुसरा सामना गमावला आहे. तर हैदराबादचा हा पहिला विजय आहे. हैदराबादनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सुनील नारायण केवळ शुन्यावर बाद झाला. तर नितीश राणानं 26 धावांची खेळी केली. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक शुन्यावर बाद झाला. त्यानंतर गिल आणि मॉर्गननं विजयी भागीदारी केली. मॉर्गनने 29 चेंडूत 42 धावा केल्या. हैदराबादकडून खलील अहमद, टी नजराजन आणि रशिद खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. दरम्यान, हैदराबादनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादकडून मनीष पांडे वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. हैदराबादकडून मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली. 38 चेंडूत पांडेने 51 धावा केल्या. कोलकाताच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्स, वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेलनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नाही. वॉर्नर-बेअरस्टो यांनी 24 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बेअरस्टो 5 धावांवर बाद झाला. तर वॉर्नर 36 धावांवर बाद झाला. ऋद्धिमान साहा 30 धावा करत धावबाद झाला. हैदराबादकडून पांडेने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 चेंडूत 51 धावा केल्या. हैदराबादचा संघ-डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे, प्रियम गर्ग, मोहम्मद नबी, वृद्धिमान शाह, अभिषेक शर्मा, रशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, टी नटराजन कोलकाताचा संघ-सुनील नारायण, दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुभमन गिल, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागाकोटी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, शिवम मावी
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या