Home /News /sport /

धोनीला मिस करताय? मग पाहा माही स्टाइल युवा खेळाडूच्या हेलकॉप्टर शॉटचा VIDEO

धोनीला मिस करताय? मग पाहा माही स्टाइल युवा खेळाडूच्या हेलकॉप्टर शॉटचा VIDEO

महेंद्रसिंग धोनीसारखा हुबेहुब हेलिकॉप्टर शॉट, या खेळाडूचा व्हिडीओ पाहून माहीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

  नवी दिल्ली, 26 जुलै : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) बऱ्याच क्रिकेट स्पर्धा आणि सामने रद्द झाले आहे. मात्र आता लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर हळूहळू क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. एकीकडे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यात कसोटी मालिका होत आहे. तर दुसरीकडे इतर देशांतील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खाननेही (Rashid Khan) मैदानात सराव करण्यास सुरुवात केली. यावेळी राशिद खानचा धोनी अवतार पाहायला मिळाला. राशिद खाननं सराव करताना पठाणीमध्ये हेलकॉप्टर शॉट खेळला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. राशिद खान आयपीएलमध्ये (IPL) सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. कोरोनाच्या काळात राशिद खानही क्रिकेटला मिस करत होता. आता अखेर राशिद मैदानावर उतरला आहे. वाचा-#BREAKING क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, IPL च्या अधिकृत तारखा जाहीर धोनीच्या चाहत्यांना राशिदचा व्हिडीओ आवडला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 2017मध्ये सनयाझर्स संघाने राशिदला 4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पहिल्या हंगामापासून राशिद हैदराबाद संघाकडून खेळतो. पहिल्या हंगामातच त्याने 17 विकेट घेतल्या होत्या. वाचा-हिंदू बायकोमुळे पाकिस्तानचा 'हा' गोलंदाज झाला दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू!
   
   
   
   
  View this post on Instagram
   
   
   

  #OrangeArmy #SRH @rashid.khan19

  A post shared by SunRisers Hyderabad (@sunrisershyd) on

  वाचा-असं कोण आऊट देतं? पंचांनी केलेल्या चुकीचा हा VIDEO पाहून डोक्यावर हात माराल 19 सप्टेंबरपासून होणार आयपीएलला सुरुवात जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं असून आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीच याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. '19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याबाबत आमची चर्चा झाली. या स्पर्धेत सामील होणाऱ्या संघांनाही आम्ही याची माहिती दिली आहे,' असं ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Sunrisers hyderabad

  पुढील बातम्या