Home /News /sport /

IPL 2020 : राजस्थानच्या विजयापेक्षा रियान परागच्या ‘त्या’ VIDEOची सगळेकडे चर्चा, तुम्ही पाहिलात का?

IPL 2020 : राजस्थानच्या विजयापेक्षा रियान परागच्या ‘त्या’ VIDEOची सगळेकडे चर्चा, तुम्ही पाहिलात का?

रियान परागने 26 चेंडूंमध्ये नाबाद 42 धावा केल्या. पण या सगळ्यात संघाच्या विजयापेक्षा लक्षणीय ठरला तो रियन परागचा शानदार डान्स.

  शारजाह, 12 ऑक्टोबर : UAE मध्ये सुरु असलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 5 विकेटनी पराभव केला. सलग चार पराभवांनंतर विजयच्या प्रतीक्षेत असलेल्या राजस्थानच्या संघाने या सामन्यात 159 धावांचा यशस्वी पाठलाग केला. राजस्थाननं सुरुवातीला आपल्या महत्त्वाच्या विकेट गमावल्या. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या रियान पराग (Riyan Parag) आणि राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला. या सामन्यात 159 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था 78 धावांवर 5 बाद झाली होती. त्यानंतर तेवतिया आणि परागने सहाव्या विकेटसाठी 85 धावांची नाबाद भागीदार करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात 18 वर्षीय रियान परागने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. राहुल तेवतियाने 28 चेंडूंमध्ये नाबाद 45 धावा केल्या तर रियान परागने 26 चेंडूंमध्ये नाबाद 42 धावा केल्या. पण या सगळ्यात संघाच्या विजयापेक्षा लक्षणीय ठरला तो रियन परागचा शानदार डान्स. शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर परागने आसामचा पारंपरिक बिहू डान्स करत विजय साजरा केला. त्याच्या या डान्सनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत. वाचा-काय सांगता! अनुष्का शर्मा आहे राशिद खानची पत्नी? 'या' गोष्टीमुळे उडाला गोंधळ
   
   
   
   
  View this post on Instagram
   
   
   

  When you're happy and you know it ☺️😊🕺🕺#Dream11IPL #SRHvRR

  A post shared by IPL (@iplt20) on

  वाचा-दोन युवा खेळाडूंमध्ये LIVE सामन्यातच राडा, एकमेकांच्या अंगावर धावून गेले अखेर... या विजयानंतर रियान पराग म्हणाला की, पाच विकेटनंतर मी आणि राहुलने हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर राशिद खान याच्या गोलंदाजीवर राहुल आक्रमक फटके खेळणार असे देखील ठरवले. राहुलने राशिदच्या गोलंदाजीवर मारलेले फटके संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे ठरले. वाचा-दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका, तब्बल 1 आठवडा खेळणार नाही 'हा' स्टार खेळाडू! दरम्यान, डान्सविषयी त्यानी सांगितलं, संघ अडचणीत असताना विजय मिळवून देणं मला नेहमीच आवडतं. त्यामुळं विजय मिळवल्यानंतर मी आनंद साजरा करण्यासाठी बिहू डान्स केला.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या