Home /News /sport /

दोन युवा खेळाडूंमध्ये LIVE सामन्यातच राडा, एकमेकांच्या अंगावर धावून गेले अखेर..., पाहा VIDEO

दोन युवा खेळाडूंमध्ये LIVE सामन्यातच राडा, एकमेकांच्या अंगावर धावून गेले अखेर..., पाहा VIDEO

शेवटच्या 5 ओव्हरमध्ये रियान आणि तेवातिया यांनी सामना पलटवला. मात्र या सामन्याच तेवातिया आणि खलील अहमद यांच्या बाचाबाचीही झाली.

    दुबई, 12 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा राहुल तेवातियाची (rahul tewatia) आतषबाजी पाहायला मिळाली. हैदराबादनं दिलेल्या 158 धावांचे आव्हान राजस्थाननं एक चेंडू राखून पार केले. या सामन्यात रियान पराग आणि राहुल तेवातिया यांनी 85 धावांची भागीदारी केली. राहुल तेवातियानं 28 चेंडूत 45 धावा करत हा सामना राजस्थानला जिंकवून दिला. मात्र हैदराबादनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नाही. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये रियान आणि तेवातिया यांनी सामना पलटवला. मात्र या सामन्याच तेवातिया आणि खलील अहमद यांच्या बाचाबाचीही झाली. 20वी ओव्हर हैदराबादकडून खलील अहमद करत होता. खलीलनं पहिल्या चार चेंडूत भेदक मारा केला. मात्र चौथ्या चेंडू दरम्यान तेवातिया आणि खलील यांच्यात वाद झाला. दोघं एकमेकांच्या अंगावरही धावून गेले. तेवातियानं खलीलनं टाकलेले चेंडू लॉग ऑनला मारत एक धाव काढली. शेवटच्या चेंडूवर रियानं षटकार लगावत सामना जिंकला. मात्र सामना संपल्यानंतर वाद आणखी चिघळला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पंचांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवातिया काही शांत होत नव्हता. मात्र सामना संपल्यानंतर दोघं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून बोलताना दिसत होते. सामन्यानंतर खलीलसोबत झालेल्या वादावर विचारले असता राहुल तेवातिया म्हणाला की, "ही काही मोठी गोष्ट नाही आहे. अशा प्रसंगी गरमागरमी होत असते". राहुल तेवातियाला त्याच्या शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच देण्यात आले. तर गुणतालिकेत राजस्थानचा संघ आता सातव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना आता सर्व सामने जिंकणे बंधनकारक आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या