मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL SRH vs KXIP: एका हेल्मेटमुळे हैदराबादनं गमावला सामना, 18व्या ओव्हरमध्ये घडला भयंकर प्रकार; पाहा VIDEO

IPL SRH vs KXIP: एका हेल्मेटमुळे हैदराबादनं गमावला सामना, 18व्या ओव्हरमध्ये घडला भयंकर प्रकार; पाहा VIDEO

एक ओव्हर आणि हैदराबादच्या हातून गेला सामना! फलंदाज नाही तर 'हेल्मेट' ठरलं कारण, पाहा VIDEO

एक ओव्हर आणि हैदराबादच्या हातून गेला सामना! फलंदाज नाही तर 'हेल्मेट' ठरलं कारण, पाहा VIDEO

एक ओव्हर आणि हैदराबादच्या हातून गेला सामना! फलंदाज नाही तर 'हेल्मेट' ठरलं कारण, पाहा VIDEO

    नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) अनेक रोमांचक सामने पाहिले आहे. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात झालेल्या सामन्यात निकाल पाहून कोणालाच विश्वास बसला नाही. पंजाबनं हैदराबादलं 12 धावांनी नमवलं. पंजाब संघानं हैदराबादला फक्त 126 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादनं कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हैदराबादच्या बॉलरनी पंजाबला 126 रनवर रोखलं. संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद 32 रन केले. मात्र, हैदराबादचा संघ 19.5 ओव्हरमध्ये 114 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे पंजाबने ही मॅच 12 रननी जिंकली. पंजाबकडून क्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. वाचा-13 सामने बाकी, टॉप-4 साठी स्पर्धा जोरदार! पाहा तुमचा आवडता प्ले ऑफ गाठणार का? हेल्मेटमुळे हैदराबादनं गमावला सामना हैदराबादच्या डावाबाबत बोलायचे झाल्यास 17व्या ओव्हरमध्ये संघानं 4 विकेट गमावत 107 धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये त्यांना 20 धावांची गरज होती. मात्र त्यानंतर असे विचित्र प्रकार घडले की कोणालाच विश्वास बसला नाही. 18व्या ओव्हरमध्ये विजय शंकरच्या हेल्मेटवर जोरदार थ्रो बसला आणि सामना फिरला. वाचा-IPL 2020 : पंजाबने सोडून दिलं, पण आता हे 2 खेळाडू गाजवत आहेत आयपीएल 18व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. त्यावेळी क्रिझवर विजय शंकर आणि जेसन होल्डर होते. अर्शदीपनं ओव्हरच्या सुरुवातीला 3 चेंडूत 2 धावा दिल्या. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर होल्डर एक चोरटी धाव काढायला गेला. त्यावेळी बॅटिंग एंडवर असलेला विजय शंकर क्रिझवर पोहचणार तेवढ्यात फील्डरचा थ्रो शंकरच्या हेल्मेटवर जाऊन बसला. शंकरच्या कानावर चेंडू बसल्यामुळे लगेचच मैदानावर फिजिओ आले. मात्र पुढच्याच चेंडूवर विजय शंकर बाद झाला. विजय शंकर आऊट झाला तेव्हा हैदराबाचा संघ 110 धावांवर होता. पंजाबनं पुढच्या 2 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. वाचा-IPL 2020 : 127 रन करण्यातही हैदराबाद अपयशी, पंजाबचा रोमांचक विजय हैदराबादचं प्ले ऑफ गाठणं कठिण हैदराबादविरुद्धच्या या विजयाबरोबरच पंजाबची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंजाबने 11 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला असून त्यांनी 6 मॅच गमावल्या आहेत. या विजयाबरोबरच त्यांनी प्ले-ऑफला पोहोचण्याचं त्यांचं आव्हान अजून कायम ठेवलं आहे. दुसरीकडे हैदराबादचं प्ले-ऑफला पोहोचणं आता कठीण झालं आहे. हैदराबादने 11 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद सहाव्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता हैदराबादला इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: SRH

    पुढील बातम्या