दुबई, 09 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये (IPL 2020) किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs KXIP) यांच्यात सामना झाला. हा सामना हैदराबादनं 69 धावांनी जिंकला. हैदराबादने ठेवलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा 16.5 ओव्हरमध्ये 132 रनवर ऑल आऊट झाला. यासह पंजाब गुणतालिकेत अंतिम स्थानी पोहचला आहे. पंजाबनं सहापैकी केवळ एक सामना जिंकला आहे.
पंजाबकडून निकोलास पूरनने 37 बॉलमध्ये 77 रनची वादळी खेळी केली. पण पंजाबच्या इतर कोणत्याही फलंदाजानं त्याला साथ दिली नाही. पंजाबचे शेवटचे तिन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. मात्र या सामन्यात 14व्या ओव्हरमध्ये एक विचित्र प्रकार घडला. खलील अहमद गोलंदाजी करत असताना पंजाबचा मुझीब रेहमानचा (Mujeeb Ur Rahman) झेल बेअरस्टोनं घेतला. मात्र अपील केल्यानंतर पंचांनी नाट आऊट असल्याचे सांगितले. यावर हैदराबादला DRS घेण्याची संधी होती, मात्र त्यांनी घेतला नाही.
वाचा-6 सामन्यातच IPL 2020 मधून बाहरे पडला 'हा' संघ! प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य
अखेर पंचांनी थर्ड अम्पायरची मदत मागितली. यात मुझीबची बॅट चेंडूला लागत असल्याचे दिसत होते. त्यामुळे थर्ड अम्पायरनं मुझीबला बाद घोषित केले. मात्र मुझीब बाद झाल्यानंतर त्यानं निर्णय अमान्य असल्याचे सांगत थर्ड अम्पायरच्या निर्णयावरच DRS घेतला. त्यामुळे एका निर्णयासाठी दोन वेळा DRS घेण्यात आला.
वाचा-IPL 2020 : पंजाबची हाराकिरी सुरूच, आता हैदराबादने धुव्वा उडवला
मुझीनं DRS घेतल्यानंतर थर्ड अम्पायरनं अल्ट्रा एजमध्ये (ultra edge) बॅटचा संपर्क चेंडूशी झाला आहे की नाही हे पाहिले. यातही चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मुझीबला पुन्हा बाद घोषित करण्यात आले. मुझीबनं घेतलेल्या या निर्णयावर ट्विटरवर ट्रोल केले जात आहे.
Umm... DRS within a DRS? I didn't even know that this was allowed. #SRHvsKXIP
— Trendulkar (@Trendulkar) October 8, 2020
DRS pe DRS #KXIPvSRH pic.twitter.com/MbaF1NHajY
— 🚬 (@badman_aa) October 8, 2020
Me after seeing Two DRS....Seriously Mujeeb : #SRHvsKXIP pic.twitter.com/AhK1mzs7k8
— Mr. Stark (@Mr_Stark_) October 8, 2020
वाचा-IPL 2020 : वॉर्नर झाला आयपीएलमधला सगळ्यात 'महान' खेळाडू
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबकडे सध्या केवळ 2 गुण आहेत. तर त्यांना नेट रन रेटही -0.431 आहे. त्यामुळे आता पंजाबला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जास्त फरकाने जिंकावे लागतील. प्ले ऑफ गाठण्यासाठी संघांना 16 गुणांची गरज असते.