Home /News /sport /

भारीच! धोनीचा कॅच सोडला तरी होतेय 'या' गोलंदाजाच्या फिल्डिंगची चर्चा, पाहा VIDEO

भारीच! धोनीचा कॅच सोडला तरी होतेय 'या' गोलंदाजाच्या फिल्डिंगची चर्चा, पाहा VIDEO

एकाच सामन्यात अनेक विचित्र प्रकार घडले. मात्र हैदराबादच्या संदीप शर्मा याचा शानदार कॅच या सामन्यातील सर्वात लक्षवेधक ठरला होता.

    दुबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. चेन्नईने 20 धावांनी हैदराबादचा पराभव करत पुन्हा एकदा ट्रकवर आली आहे. या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत चेन्नईचा संघ ता सहाव्या क्रमांकावर आला आहे. या सामन्यात विविध चकित करणाऱ्या घटना घडल्या होत्या. यामध्ये अंम्पायर पॉल रायफेल यांचा वाईड संदर्भातील निर्णय असो किंवा राशिद खान याची हिट विकेट असो. एकाच सामन्यात अनेक विचित्र प्रकार घडले. मात्र हैदराबादच्या संदीप शर्मा याचा शानदार कॅच या सामन्यातील सर्वात लक्षवेधक ठरला होता. वाचा-एकाच चेंडूवर दोन वेळा राशिद खान बाद, VIDEO पाहून तुम्हीच ठरवा नक्की कसा झाला OUT या सामन्यात संदीप शर्मा याने शानदार गोलंदाजी करत चार ओव्हरमध्ये 19 धावा देत 2 विकेट घेतल्या. यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने धोनीचा कॅच पकडण्याचा केलेला प्रयत्न खूपच जबरदस्त होता. या चेंडूवर धोनी बाद होताहोता वाचला. वाचा-धोनीचा 'विराट' अवतार, कॅप्टन कूलच्या रागामुळे पंचांनी बदलला निर्णय? संदीप शर्माच्या गोलंदाजीवर धोनीने मारलेल्या शॉटवर संदीपने सुपरमॅन सारखी उडी मारत कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. हा कॅच पकडण्यात त्याला यश आलं नाही, पण त्याच्या प्रयत्नांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कॉमेंट्री बॉक्समधील मार्क निकोलस यांनी देखील हा आतापर्यंतचा सर्वांत जबरदस्त कॅच ठरला असता असं म्हटले. वाचा-अजूनही धोनीला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी? असा आहे Point Table दरम्यान, या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने 13 चेंडूंमध्ये 21 धावा करत संघाला उत्तम स्कोअर उभा करून दिला. या सामन्यात चेन्नईच्या 168 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये केवळ 8 बाद 147 धावाच करता आल्या. हैदराबादच्या वतीने केन विलियम्सनने शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याच्या 57 धावांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: SRH

    पुढील बातम्या