IPL : शाहरूखला मोठा झटका, 'या' दोन मुख्य खेळाडूंनी सोडली KKRची साथ!

याआधी जॅक कॅलिसनं मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळं आता कोलकाता संघाची चिंता वाढली आहे.

  • Share this:

आयपीएलमध्ये आपली छाप सोडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला एकामागून एक मोठे झटके मिळत आहेत. यावर्षी हा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकला नाही. त्यामुळं संघात मोठे बदल करण्याच्या विचारात संघ व्यवस्थापन आहे.

दरम्यान केकेआर संघाचे हेड कोच जॅक कॅलिस यांनी याआधी संधाची साथ सोडली होती. त्याचबरोबर सहाय्यक कोच साईमन कैटिस यांनीही आपले पद सोडले.

आता संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. इंडियन एक्सप्रसनं दिलेल्या माहितीनुसार टीमचा खेळाडू लॉकी फग्युर्सन यांने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकीला आयपीएलमध्ये केकेआर संघानं 1.6 कोटींना खरेदी केले होते. त्यानं पाच सामन्यात 10.76च्या इकॉनॉमीनं केवळ दोन विकेट घेतल्या.

त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू कार्लोस ब्रेथवेटही कोलकाताला रामराम करणार आहे. ब्रेथवेटला कोलकाता संघानं तब्बल 5 कोटींना विकत घेतले होते. त्यानं गेल्या हंगामात केवळ दोन सामने खेळले होते.

ब्रेथवेट आणि लॉकी यांनी कोलकाताची साथ सोडल्यामुळं शाहरूखला आपला संघ मजबूत करण्यासाठी मोठ्या ऑलराऊंडर खेळाडूंची तसेच मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 01:50 PM IST

ताज्या बातम्या