Home /News /sport /

फायनली IPL 2020 Schedule विषयी आली बातमी; सौरव गांगुलीने जाहीर केली तारीख

फायनली IPL 2020 Schedule विषयी आली बातमी; सौरव गांगुलीने जाहीर केली तारीख

याआधी 2014मध्ये आयपीएलचे काही सामने युएइमध्ये झाले होते. 2014मध्ये एका संघाने युएइच्या मैदानावर जास्तीत जास्त षटकार मारण्याची कामगिरी केली. मात्र एका संघाचा फ्लॉप होता. यावेळी या संघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

याआधी 2014मध्ये आयपीएलचे काही सामने युएइमध्ये झाले होते. 2014मध्ये एका संघाने युएइच्या मैदानावर जास्तीत जास्त षटकार मारण्याची कामगिरी केली. मात्र एका संघाचा फ्लॉप होता. यावेळी या संघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

IPL च्या टीम पोहोचल्या तरीही अजून स्पर्धेचं शेड्यूल (IPL 2020 schedule) जाहीर झालेलं नाही. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav ganguly) यांनी गुरुवारी याविषयी शेवटी सूतोवाच केलं.

  नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : Coronavirus च्या छायेखाली या वर्षी IPL भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय घेतला. पण संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) IPL च्या टीम पोहोचल्या तरीही अजून स्पर्धेचं शेड्यूल (IPL 2020 schedule) जाहीर झालेलं नाही. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav ganguly) यांनी गुरुवारी याविषयी शेवटी सूतोवाच केलं. IPL 2020 चं शेड्यूल उद्या म्हणजे शुक्रवारी जाहीर होईल, अशी माहिती गांगुली यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज दिवसअखेर सामन्यांच्या वेळा आणि काही फायनल डिटेल्सची चर्चा पूर्ण होईल, उद्या वेळापत्रक (IPL schedule) जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं. या वेळी वेळापत्रकाला उशीर झाला आहे, याची कल्पना आहे. पण आता ते शेवटच्या टप्प्यात आहे. BCCI उद्या संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करणार की रूपरेषा देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या संघ, खेळाडू आणि चाहते आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. याआधी असे सांगितले जात होते की, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि उप-विजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात ओपनिंग सामना होणार आहे. मात्र चेन्नई संघाचे खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर वेळापत्रकात बदल होऊ शकतो. चेन्नई संघाच्या (CSK) सीइओने दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबरपासून पुन्हा संघाची ट्रेनिंग सुरू होणार आहे. चेन्नईचा संघ 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज असला तरी बीसीसीआय काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे. याआधी अशीही माहिती होती की ओपनिंग सामना हा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होऊ शकतो. खेळाडूंच्या माघारीने चिंता आयपीएल 2020 (IPL 2020) तेराव्या हंगामाला दोन आठवडे शिल्लक असताना खेळाडू माघार घेण्याचा प्रकार सुरूच आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाज सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: BCCI

  पुढील बातम्या