IPL 2020 : हार्दिक पांड्या फिट झाला नाही तर, मुंबई इंडियन्सकडे असणार ‘हे’ 5 पर्याय

हार्दिक पांड्या आयपीएलला मुकल्यास मुंबई इंडियन्सला वापरावे लागतील हे पाच प्रमुख पर्याय.

  • Share this:

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2020चा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. 4 वेळा त्यांना आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले आहे. मात्र या हंगामात मुंबईच्या खेळाडूंची दुखापत त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मुंबई इंडियन्सचे प्रमुख खेळाडू म्हणजे कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत. बुमराहनं टीम इंडियात कमबॅक केला असला तरी त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. तर, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या संघाबाहेर आहेत.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी -20 सामन्यात 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पाठीला दुखापत झाली होती. टी -20 वर्ल्ड कप लक्षात घेता बीसीसीआयने पंड्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठविले. शस्त्रक्रियेनंतर न्यूझीलंड दौऱ्यात त्याचा संघात समावेश होईल अशी अपेक्षा होती, मात्र असे झाले नाही.

हार्दिक पांड्या कमबॅक करू शकला नाही तर मुंबईसाठी हा मोठा धक्का असेल. सध्या हार्दिक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. हार्दिक वगळता मुंबईकडे जयंत यादव, केरेन पोलार्ड, कृणाल पांड्या, अंकुल रॉय आणि नॅथन कुल्टर नाईल यांसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत.

जयंत यादव हा दिल्लीचा युवा खेळाडू असून, आयपीएलचे सुरुवातीचे काही हंगाम तो दिल्ली डेअरडेविल्स संघात होता. त्यानंतर 2018मध्ये मुंबईने त्याला विकत घेतले. जयंत यादवने 12 सामन्यात फक्त 5 धावा केल्या आहेत, तर 5 विकेट घेतल्या आहेत.

केरेन पोलार्ड हा मुंबईसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत 148 सामने खेळले आहेत. यात त्यानं 2755 धावा तर 56 विकेट घेतल्या आहेत. मुंबईला अनेक सामने पोलार्डनं एकहाती जिंकून दिले आहेत.

पांड्या ब्रदर्स यांनी मुंबई इंडियन्ससाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. कृणाल पांड्याने हार्दिक एवढे सामने खेळले नसले तरी त्यानं 55 सामन्यात 891 धावा केल्या आहेत तर 40 विकेटही घेतल्या आहेत.

झारखंडचा युवा खेळाडू अनुकुल रॉय यानं 2019मध्ये मुंबईतून पदार्पण केले. फलंदाजीमध्ये त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नसली तरी, त्यानं पहिल्याच सामन्यात 2 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली होती.

नॅथन कुल्टर नाईल हा ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र 2017नंतर आयपीएल सामना खेळलेला नाही. याधी कुल्टर नाईल दिल्ली संघात होता, 2020मध्ये मुंबई संघाने नॅथनला 8 कोटींना विकेत घेतले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही नॅशनने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचबरोबर नॅथन चांगल्या फॉर्ममध्येही आहे. मात्र केवळ 4 विदेशी खेळाडू अकरा खेळाडूंमध्ये खेळवता येऊ शकतात. त्यामुळं नॅथनला संघात घेण्यासाठी रोहितला महत्त्वाचे बदल करावे लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 10:10 PM IST

ताज्या बातम्या