नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : आयपीएलच्या 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्ज संघ (Chennai Super Kings) प्ले ऑफ गाठू शकला नाही आहे. राजस्थान (Rajasthan Royals)ने मुंबई (Mumbai Indians)चा पराभव करत चेन्नई (CSK)चा प्ले-ऑफमध्ये खेळण्याचा दरवाजा बंद केले आहेच. यामुळे चेन्नई ही प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. चेन्नईनं आयपीएलमध्ये 11 वेळा भाग घेतला आहे. यातील 10 वेळा त्यांना प्ले ऑफ गाठण्यात यश आलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघानं बॅंगलोरला हरवले असले तरी, त्यांचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे CSKचे चाहते नाराज झाली आहे. साक्षी धोनीनंही सोशल मीडियावर भावुक होत एक पोस्ट शेअर केली.
साक्षीनं इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत, एक कविता लिहिली आहे. या कवितेत, "हा एक खेळ आहे. कोणालाही पराभव आवडत नाही, पण सगळे जिंकूही शकत नाही. काही लोकं जिंकतात तर काही हरतात. काही लोकं काही गमवतात, पण हा फक्त एक खेळ आहे. एकीकडे एक जिंकण्याचा आनंद साजरा करत आहे तर दुसरा दु:खी आहे. एवढ्या वर्षात आपण मोठे विजयही पाहिले आणि पराभवही. तुम्ही तेव्हाही विजेता होतात, आजही विजेता आहात. खरे योद्धा हे लढण्यासाठी जन्म घेतात. तुमच्या डोक्यात आणि हदयात तुम्ही आजही सुपरकिंग्ज आहात".
वाचा-IPL 2020 : राजस्थानच्या विजयामुळे चेन्नईचं स्वप्न भंगलं, प्ले-ऑफचा मार्ग बंद
वाचा-IPL 2020 : लोक म्हणायचे साक्षीचा असिस्टंट, CSK कडून खेळणारा मोनू कुमार कोण आहे?
आठव्या स्थानी आहे CSK
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये दिसणार नाही. आतापर्यंत चेन्नईने खेळलेल्या सगळ्या आयपीएलच्या मोसमात ते प्ले-ऑफला पोहोचले होते. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नईच्या टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही दोन वर्ष वगळता आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पहिल्या वर्षापासून चेन्नईची टीम प्रत्येक वर्षी होती. यंदाच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली. आतापर्यंत खेळलेल्या 12 मॅचपैकी 4 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला असून 8 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये सध्या चेन्नईची टीम शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sakshi dhoni