दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) ही अशी स्पर्धा आहे जिथं खेळाडू लोकांचं मनोरंजन करण्यासाठी खेळतात. मग त्यांच्यावर कोणतंही संकट का असो, असच काहिसं शनिवारी झालेल्या सामन्यांमध्ये दिसलं. कोलकाता विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात नितिश राणा आपल्या सासऱ्यांच्या निधनानंतर मैदानात उतरला. नितीश राणा याने या मॅचमध्ये अर्धशतक करुन सासऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. तर, पंजाब विरुद्ध हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबकडून मनदीप सिंग वडिलांच्या निधनानंतरही खेळण्यासाठी मैदानात उतरला.
पंजाबची टीम बॅटिंगसाठी उतरली तेव्हा मनदीप सिंग केएल राहुलसोबत बॅटिंगसाठी आला. 14 बॉलमध्ये 17 रन करुन मनदीप माघारी परतला. मनदीपच्या दु:खात सहभाग नोंदवण्यासाठी पंजाबची टीम आज दंडाला काळी पट्टी बांधून खेळत आहे. मनदीप सिंग आणि नितिश राणा या दोन्ही खेळाडूंचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कौतुक केले.
वाचा-IPL 2020 : काल रात्री वडील गेले, आज मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरला
🙏🙏#Dream11IPL pic.twitter.com/zFHMftQh4H
— IndianPremierLeague (@IPL) October 24, 2020
वाचा-IPL 2020 : अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाने जर्सी का झळकावली? पाहा कारण
सचिननं ट्वीट करत, आपल्या जवळच्या व्यक्तींच्या जाण्याचे दु:ख मोठं असतं, पण त्याहून वाईट म्हणजे आपल्याला त्यांना अखेरचा निरोपही देता येत नाही. मनदीप आणि नितिश दोघांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो आणि आज तुम्ही संघासाठी जे केलं, त्यासाठी तुम्हाला सलाम. सचिन स्वत: 1999मध्ये वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी केनियाविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्यात त्यानं 140 धावांची शतकी खेळी करत वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती.
Loss of a loved one hurts, but what’s more heartbreaking is when one doesn’t get to say a final goodbye. Praying for @mandeeps12, @NitishRana_27 and their families to heal from this tragedy. Hats off for turning up today. Well played.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 24, 2020
वाचा-हेल्मेटमुळे हैदराबादनं गमावला सामना, 18व्या ओव्हरमध्ये घडला भयंकर प्रकार
मनदीप सिंग आयपीएलसाठी युएईला जाण्याआधीच त्याचे वडील आजारी होते. मनदीप सिंग याच्या वडिलांचं निधन झाल्याच्या बातम्या कालपासून प्रसिद्ध होत होत्या, पण मनदीपच्या भावाने हे वृत्त फेटाळून लावलं होतं. अखेर पंजाबच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मनदीपच्या वडिलांच्या निधनाला अधिकृत दुजोरा दिला.