दुबई, 23 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) कोणते 4 संघ प्ले ऑफ गाठणार हे अजून निश्चित झाले नाही आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात झालेल्या सामन्यानं गुणतालिकेचे रुप पालटले. मनिष पांडे आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबाद (SRH)ने राजस्थान (Rajasthan Royals)चा 8 विकेटने पराभव केला आहे.
मात्र या सामन्यात एका स्टार खेळाडूनं आपल्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद केली. हैदराबादनं या सामन्यात टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानकडून रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स यांनी डावाची सुरुवात केली. स्टोक्सनं 32 चेंडूत 2 चौकार लगावत 30 धावा केल्या. मात्र, आयपीएलच्या या हंगामात स्टोक्सला अद्याप एक षटकार मारता आलेला नाही आहे.
वाचा-राजस्थानच्या पराभवानं उघडले धोनीचे दरवाजे, अशी गाठणार CSK प्ले ऑफ
स्टोक्सनं आयपीएल 2020मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. या 5 सामन्यात 22.00च्या सरासरीनं आणि 106.79च्या स्ट्राइर रेटनं 110 धावा केल्या आहेत. यात 14 चौकारांचा समावेश आहे. मात्र एकही षटकार नाही आहे. स्टोक्सनं आयपीएलमध्ये 103 चेंडूचा सामना केला आहे. यासह स्टोक्सच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.
वाचा-IPL 2020 : मनिष पांडेला शंकरची साथ, हैदराबादचा राजस्थानवर विजय
Maximum number of balls played without hitting a six in an #IPL season. Ben Stokes has joined this list in #IPL2020 (103 balls thus far)
Nugget for the trolls—I don’t make the list because I wasn’t good enough to play 100 balls in one season. 🙈😛 pic.twitter.com/ucVqdb86NU
— Aakash Chopra (@cricketaakash) October 22, 2020
वाचा-IPL 2020 : मॅकल्लम डायरीमध्ये काय लिहित होता? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
आयपीएलच्या जास्त चेंडू खेळून एकही सिक्स न मारण्याच्या यादीत मनदीप सिंगचा पहिला क्रमांकावर आहे. मनदीपने 2013 आयपीएलमधअये 223 चेंडू खेळून एकही षटकार लगावला नव्हता. दुसऱ्या क्रमांकावर हनुमा विहारी आहे. हनुमानं 143 चेंडू खेळूनही सिक्स लगावला नव्हता. एवढेच नाही तर या यादीत व्हीव्हीएस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा, केन विल्यम्सन आणि कुमार संगाकारा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचेही नाव आहे.