मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 RR vs KXIP : तीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6! पाहा VIDEO

IPL 2020 RR vs KXIP : तीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6! पाहा VIDEO

या सामन्यात एकूण 449 धावा करण्यात आल्या. आयपीएलच्या इतिहासातली सर्वाधिक टोटल आणि रन चेस होता.

या सामन्यात एकूण 449 धावा करण्यात आल्या. आयपीएलच्या इतिहासातली सर्वाधिक टोटल आणि रन चेस होता.

राजस्थान रॉयल्सचा संघ (Rajasthan Royals) 224 धावांचे टार्गेट चेस करेल असे वाटतही नसताना राजस्थाननं सामना जिंकला.

    शारजाह, 28 सप्टेंबर : सामना टी-20 असेल तर काहीही होऊ शकतं. असाच काहीसा प्रकार राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्यात घडला. राजस्थान रॉयल्सचा संघ (Rajasthan Royals) 224 धावांचे टार्गेट चेस करेल असे वाटतही नसताना राजस्थाननं सामना जिंकला. राहुल तेवातियानं (Rahul Tewatia) एका ओव्हरमध्ये 5 षटकार लगावत संपूर्ण सामन्याचं रुप पालटलं. युवा फलंदाज अखेरच्या दोन ओव्हरमध्ये राहुल तेवातियानं जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं 30 चेंडूत 7 षटकार लगावत 53 धावा केल्या आणि पंजाबच्या तोंडचा घास पळवला. एका ओव्हरमध्ये पलटला सामना स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर राहुल तेवातिया फलंदाजीसाठी येईल असे कोणालाही वाटत नव्हते. एकवेळ अशी होती, जेव्हा राहुलला एक धाव काढणंही कठिण जात होतं, मात्र एका ओव्हरनं संपूर्ण सामना फिरला. तेवातियानं पहिल्या 8 धावांसाठी 19 चेंडू घेतले. 17 ओव्हरमध्ये 85 धावांची आक्रमक खेळी केल्यानंतर संजू सॅमसन बाद झाला. सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थान सामना गमावेल, असे वाटत होते. मात्र 18व्या ओव्हरमध्ये तेवातियानं 5 षटकार लगावले. शेल्डन कॉटरेलच्या एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार लगावत राजस्थानचा विजय पक्का झाला. अखेरच्या 3 ओव्हरमध्ये राजस्थाननं 51 धावा केल्या. तेवतियाने 5 षटकार लगावत शेवटच्या 2 ओव्हरमध्ये राजस्थानला केवळ 12 धावांची गरज होती. सामना एक रेकॉर्ड अनेक >> या सामन्यात एकूण 29 षटकार लगावण्यात आले. यातील पंजाबने 11 षटकार लगावले. यात मयंकने 7 षटकार लगावले. >> 18 षटकार राजस्थानकडून मारण्यात आले. यातीन राहुल आणि तेवातिया यांनी प्रत्येकी 7-7 षटकार लगावले. >> या सामन्यात एकूण 34 चौकार लगावले. >>या एकाच सामन्यात एक शतक 4 अर्धशतक लगावले. मयंक अग्रवालनं शतकी खेळी केली. तर स्मिथ, राहुल, सॅमसन आणि तेवातिया यांनी अर्धशतकी खेळी केली. >> या सामन्यात एकूण 449 धावा करण्यात आल्या. आयपीएलच्या इतिहासातली सर्वाधिक टोटल आणि रन चेस होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या