स्पोर्ट्स

  • associate partner

...म्हणून 10 लाखांची बेस प्राइज असलेल्या राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं!

...म्हणून 10 लाखांची बेस प्राइज असलेल्या राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं!

आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने आतापर्यंत इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. या सामन्याचा खरा हिरो होता राजस्थानचा राहुल तेवतिया.

  • Share this:

शारजाह, 28 सप्टेंबर : आयपीएल 2020मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 4 विकेट्सनी पराभव केला. 224 धावांचा पाठलाग करत राजस्थानाने इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने आतापर्यंत इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. राजस्थानचा संजू सॅमसन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी धमाकेदार खेळी करत राजस्थानचा विजय सोपा केला. या सामन्याचा खरा हिरो होता राजस्थानचा राहुल तेवतिया.

राहुलने या सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीचं दर्शन घडवत सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. शेल्डन कॉट्रेल याला एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारत त्यानं सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला. या सामन्यात सुरुवातीला अडखळत फलंदाजी करणाऱ्या राहुल तेवतियाने 31 चेंडूत 53 धावा करत कॉट्रेलला आस्मान दाखवलं. कोण आहे हा राजस्थानचा नवीन खेळाडू, असा प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलाच असेल. आज आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

वाचा-तीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6! पाहा VIDEO

हरियाणाकडून खेळतो रणजी

राहुल तेवतिया हा हरियाणाकडूनकडून रणजी ट्रॉफी खेळतो. 27 वर्षीय खेळाडूला अजूनपर्यंत टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएलमध्ये त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. 2013 मध्ये त्याने हरियाणाकडून रणजी पदार्पण केलं असून, आतापर्यंत केवळ 7 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये मात्र त्याने 50 सामने खेळले आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदा त्याला राजस्थानकडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

वाचा-29 षटकार, 34 चौकार अन् 449 धावा! एकाच सामन्यात रचले गेले 5 रेकॉर्ड

त्यानंतर त्याला पंजाब संघाने खरेदी केलं. पंजाबच्या संघात त्याला जास्त सामने खेळायला मिळाले नाहीत. मात्र 2018 मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेत विविध संधी दिल्या होत्या. मात्र त्याच्या खराब खेळामुळे त्याला रिलीज केलं. त्यानंतर 2020 च्या लिलावात राजस्थानच्या संघानी त्याला ट्रेडिंगमध्ये घेतलं.

10 लाखांची बेस प्राइज लिलावात मिळाले 3 कोटी

टी-20 क्रिकेटमध्ये राहुलचा स्ट्राईक रेट हा खूप जास्त आहे. जवळपास 153 च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करत असल्यामुळे 2018 मध्ये आयपीएलच्या लिलावात पंजाब आणि दिल्लीच्या संघामध्ये त्याला घेण्यासाठी स्पर्धा लागली होती. मात्र अखेर दिल्लीच्या संघाने 3 कोटी रुपये मोजत त्याला आपल्या संघात घेतलं.

वाचा-निकोलस पूरनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा हा VIDEO मिस केला तर लगेच पाहा

10 लाख रुपये बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला आपल्या कामगिरीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर 3 कोटी रुपये किंमत मिळाली. दरम्यान नेट प्रॅक्टिसमध्ये मोठे मोठे फटके मारणाऱ्या तेवतियाला रविवारी राजस्थानच्या संघाने दिलेल्या संधीचं त्यानी सोनं करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Published by: Priyanka Gawde
First published: September 28, 2020, 3:58 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या