स्पोर्ट्स

  • associate partner

Unbelievable! निकोलस पूरनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा हा VIDEO मिस केला तर लगेच पाहा

Unbelievable! निकोलस पूरनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा हा VIDEO मिस केला तर लगेच पाहा

आयपीएलच्या इतिहासातलं सर्वात जबरदस्त क्षेत्ररक्षण, हा VIDEO पाहिला नाही पाहिला तर काय पाहिलं?

  • Share this:

शारहाज, 28 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. पंजाबने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग राजस्थाननं 4 विकेट राखून केला. राजस्थानकडून संजू सॅमसननं 42 चेंडूत 85 धावा केल्या. तर युवा फलंदाज अखेरच्या दोन ओव्हरमध्ये राहुल तेवातियानं जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं 30 चेंडूत 7 षटकार लगावत 53 धावा केल्या आणि पंजाबच्या तोंडचा घास पळवला. या सामन्यात संजू सॅमसन आणि मयंक अग्रवाल यांनी आपल्या संघासाठी जबरदस्त फलंदाजी केली. मयंकने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं.

मात्र, यात सर्वांचे लक्ष वेधले ते पंजाबचा फलंदाज निकोलस पूरननं. पूरनने फलंदाजीनं नाही तर यावेळी आपल्या क्षेत्ररक्षणामुळे सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केलं. आठव्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसननं दणदणीत शॉट मारला. हा षटकारच होता. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या निकोलसनं हवेत उडी मारत कॅच घेतला, मात्र पूरनचा तोल गेला, प्रसंगावधान दाखवत पूरनं चेंडू सीमारेषेच्या आत फेकला. पूरननं केलेले क्षेत्ररक्षण पाहून पंजाबचा फिल्डिंग कोच जॉंटी ऱ्हॉड्सने उभे राहून त्याचे कौतुक केले.

पूरनची अशा प्रकारची क्षेत्ररक्षण पाहून चाहते वेडे झाले. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रितेश देशमुख यांनीही पूरनचे कौतुक केले.

त्याआधी फलंदाजी करताना पूरननं शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारत 8 चेंडूत 25 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी,राजस्थानच्या गोलंदाजांची पिसं काढत पहिल्या विकेटसाठी तब्बल 183 धावांची भागीदारी केली. यात मयंक अग्रवालनं दुसरं सर्वात जलद शतक पूर्ण केलं. मयंकने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. अग्रवाल 50 चेंडूत 106 धावा करत बाद झाला. तर राहुलनं 54 चेंडूत 69 धावा केल्या.

Published by: Priyanka Gawde
First published: September 28, 2020, 9:07 AM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या