Home /News /sport /

IPL की गल्ली क्रिकेट? कॅमेऱ्याला चेंडू लागून फलंदाज बाद, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

IPL की गल्ली क्रिकेट? कॅमेऱ्याला चेंडू लागून फलंदाज बाद, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

या सामन्यात काही विचित्र प्रकारही घडले. या सामन्यात राजस्थानकडून रॉबिन उथप्पानं चेंडूला लाळ लावत कोरोनाचा नियम मोडला तर, जयदेव उनाडकट विचित्र पद्धतीने बाद झाला.

    दुबई, 01 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामातील (IPL 2020) 12वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (RR Vs KKR) यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाता संघानं एकहाती विजय मिळवत राजस्थानचा 37 धावांनी पराभल केल. पहिले फलंदाजी करताना KKRने 20 ओव्हरमध्ये 174 धावा केल्या. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ 137 धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थान संघाचा हा पहिला पराभव आहे. याआधी राजस्थाननं दोन्ही सामने जिंकले आहे. या सामन्यात कोलकाता संघातीन युवा गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र या सामन्यात काही विचित्र प्रकारही घडले. या सामन्यात राजस्थानकडून रॉबिन उथप्पानं चेंडूला लाळ लावत कोरोनाचा नियम मोडला तर, जयदेव उनाडकट विचित्र पद्धतीने बाद झाला. वाचा-जमिनीवर डोकं आपटलं पण त्यानं चेंडू नाही सोडला! पाहा सॅमसनचा जबरदस्त कॅच VIDEO नेमकं काय घडलं? राजस्थान रॉयल्सच्या 18व्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकट बाद झाला. जयदेव 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. उनाडकटसोबत टॉम करन फलंदाजी करत होता. कुलदीप यादवच्या चेंडूवल कमलेश नागरकोटीनं डीम मिड विकेटमध्ये जयदेवचा कॅच घेतला. पंचांनी जयदेवला बादही घोषित केले. मात्र जयदेव मैदानातून बाहेर गेला नाही. कारण त्यानं पाहिले की चेंडू स्पाइडरकॅम्पवर आदळून डिफ्लेक्ट झाला, त्यामुळे तो बाद नव्हता. वाचा-क्रिकेटच्या मैदानातून थेट सिनेमाजगतात धोनीची एंट्री, साक्षीनं सांगितला प्लॅन वाचा-IPL 2020 : अबु धाबीमध्ये झहीरची मराठीत शिकवणी, मुंबईच्या बॉलरला खास टिप्स काय आहे ICCचा नियम? ICCच्या नियमानुसार, जर चेंडू स्पाइडर कॅम किंवा त्याच्या केबलला आदळला तर चेंडू डेड बॉल जाहीर केला जाते. रिप्ले दरम्यान कॉमेंट्री करणार इरफान पठाण आणि आकाश चोप्रा यांनीही सांगितले की चेंडू स्पाइडरकॅम्पवर आदळून डिफ्लेक्ट झाला. मात्र तरी पंचांनी जयदेव उनाडकटला बाद घोषित केले. या विकेटचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ट्विटरवर चाहत्यांनी हे IPL की गल्ली क्रिकेट? असा सवाल केला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या