शारजाह, 22 सप्टेंबर : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात झालेल्या सामन्यात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या सामन्यात संजू सॅमसननं (Sanju Samson) 9 षटकार आणि एका चौकारांच्या मदतीनं तब्बल 231.25च्या स्ट्राइक रेटनं 32 चेंडूत 74 धावा केल्या. सॅमसननं 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण करत, एक खास रेकॉर्ड नावावर केला. आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याच्या यादीत संजू सॅमसननं केएल राहुलची (KL Rahul) बरोबरी केली आहे. दोघांनी आयपीएलमध्ये 19 चेंडूत अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम केला आहे.
राजस्थानकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम मात्र जॉस बटलरच्या नावावर आहे. बटलरनं आयपीएलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक केले होते. राजस्थानकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिल्याच सामन्यात संजूनं तुफानी खेळी केली. संजूनं आपल्या 74 धावांच्या खेळीत तब्बल 9 षटकार मारले. यासह सॅमसन पहिला फलंदाज आहे, ज्यानं एका डावात सर्वात जास्त षटकार मारले आहेत. याआधी 2018मध्ये बंगळुरूविरुद्ध त्यानं 10 षटकार मारले होते.
वाचा-जगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित!
6,6,6,6,6,6,6,6,6
Yes you read that right. Sanju Samson hits 9 SIXES in his innings of 74 off 32.
Watch them all here 📽️📽️https://t.co/mA8K5i6Gl8 #Dream11IPL #RRvCSK
— IndianPremierLeague (@IPL) September 22, 2020
वाचा-कोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा
मात्र संजूनं तुफानी खेळी केली असली तरी सोशल मीडियावर मात्र ऋषभ पंतच्या नावाची चर्चा आहे. ट्विटरवर सध्या ऋषभ पंत ट्रेंडवर असून अनेक मिम्स तयार केले जात आहेत.
Rishabh Pant after watching Sanju Samson's inning pic.twitter.com/6631m0IR78
— Pratyush (@pratyushmanutd) September 22, 2020
संजूनं पहिल्याच सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत पुन्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्याचबरोबर पंतच्या जागी विकेटकीपर फलंदाज म्हणून संजूची वर्णी लागावी, अशी आशा भारतीय चाहते व्यक्त करत आहे. पंतने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात 29 चेंडूत 31 धावा केल्या होत्या.
Rishabh Pant right now..#IPL2020 #CSKvRR pic.twitter.com/Md7Hm8CDgV
— RVCJ Media (@RVCJ_FB) September 22, 2020
Rishabh Pant after watching Sanju Samson innings - pic.twitter.com/uwjEuRLduW
— Life Of Arjun In Home (@looserboihere) September 22, 2020
वाचा-मुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण
दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये राजस्थानने 216 धावा करत चेन्नईला 217 धावांचे आव्हान दिले. संजूबरोबरच कर्णधार स्टीव्ह स्मिथनं 42 चेंडूत 69 धावांची खेळी केली. आर्चरनं शेवटच्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारत राजस्थानला 200चा आकडा पार करून दिला.