IPL 2020 : न्यूझीलंडला फायनलपर्यंत पोहचवणारा प्रशिक्षक आता विराटला जिंकून देणार IPL!

IPL 2020 : न्यूझीलंडला फायनलपर्यंत पोहचवणारा प्रशिक्षक आता विराटला जिंकून देणार IPL!

गेल्या हंगामात निराशाजन कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूनं संघात मोठ बदल केले आहेत.

  • Share this:

बंगळुरू, 23 ऑगस्ट : इंडियन प्रिमीयर लीगच्या 12व्या हंगामाआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघानं संघात मोठे बदल केले आहेत. बंगळुरू संघानं न्यूझीलंडला वर्ल्ड कप 2019मध्ये फायनलपर्यंत पोहचवणारे माईक हेसन यांची क्रिकेट डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. माईक हेसन यांनी याआधी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच बंगळुरू संघानं ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज साईमन कॅटिच यांची मुख्य प्रशिक्षक पदी निवड केली आहे.

याआधी संघाचे प्रशिक्षक भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार गॅरी क्रस्टर्न होते. तर, बंगळुरू संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघानं आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही.

बंगळूरू संघानं ट्विटरवरून, हेसन आणि कॅटिच यांच्या नियुक्तीची घोषणा केली. बंगळुरू संघाचे चेअरमन संजीव चुरीवाला यांनी, "बंगुळरू संघाचे लक्ष्य आयपीएलमधील सर्वात कामगिरी करणारा संघ करणे आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी माईक हेसन आणि कॅटिच यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीमुळं आम्ही खुप खुश आहोत. आम्हाला विश्वास आहे की संघासाठी हेसन आणि कॅटिच चांगली कामगिरी करतील", असे सांगितले.

वाचा-'फक्त शतक करण्यासाठी खेळायला मी स्वार्थी नाही', उत्तराची चर्चा

आयपीएल 2019मध्ये केली होती खराब कामगिरी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं आयपीएलच्या अकराव्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली होती. अंकतालिकेत बंगळुरूचा संघ 8व्या क्रमांकावर होता. बंगळूरू संघाला 14 सामन्यांपैकी पाच सामन्यांत पराभव मिळाला होता. बंगळुरू संघानं हंगामाच्या सुरुवातीलाच सलग पाच सामन्यात पराभव मिळाला होता. त्यामुळं प्ले ऑफमध्ये आपली जागा मिळवणे कठिण झाले होते. त्यामुळं या संघाच्या मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

वाचा-टीम इंडियाच्या 'या' प्रशिक्षकाला नारळ, निवड समितीनं बीसीसीआयकडे केली शिफारस

भारतीय संघाच्य प्रशिक्षकपदी माईक हेसन होते आघाडीवर

न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत सामिल झाले होते. 2015च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पोहचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी प्रशिक्षक म्हणून हेसन काम पाहत होते.

वाचा-विराट-शास्त्रींनी का घेतलं नाही रोहितला संघात? रहाणेनं केला खुलासा

'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL

First published: August 23, 2019, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading