स्पोर्ट्स

  • associate partner

फक्त 20 लाखांना विकत घेतलेल्या 'या' युवा फलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्येच उडवली SRHची झोप!

फक्त 20 लाखांना विकत घेतलेल्या 'या' युवा फलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्येच उडवली SRHची झोप!

कर्नाटकचा 20 वर्षीय युवा गोलंदाज देवदत्त पडीक्कलला या सामन्यात विराटनं संधी दिली. विराटनं ठेवलेला विश्वास या 20 वर्षीय फलंदाजानं योग्य ठरवला.

  • Share this:

दुबई, 21 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगाम आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात होत आहे. या सामन्यात हैदराबादनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र RCBच्या 20 वर्षीय फलंदाजानं हैदराबादच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूकडून फिंच आणि युवा देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) यांनी सलामीला आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. देवदत्तनं 36 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यात 8 चौकारांचा समावेश आहे.

कर्नाटकचा 20 वर्षीय युवा गोलंदाज देवदत्त पडीक्कलला या सामन्यात विराटनं संधी दिली. विराटनं ठेवलेला विश्वास या 20 वर्षीय फलंदाजानं योग्य ठरवला. बंगळुरू संघाने देवदत्तला आयपीएल लिलावात 20 लाखांच्या बेस प्राइजवर विकत घेतले होते. मात्र या फलंदाजानं आपल्या पहिल्याच सामन्यात SRHची झोप उडवली. पहिल्याच सामन्यात देवदत्तनं हैदराबादच्या गोलंदाजांची शाळा घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये संदीप शर्माला 2 चौकार मारत त्यानं आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली.

मुळचा केरळचा असलेला देवदत्त कर्नाटककडून त्यानं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2018-19च्या रणजी सामन्यात देवदत्तनं सुरुवात केली. तर भारत अ संघासाठी त्यानं 2019मध्येच पदार्पण केले. मात्र देवदत्त सर्वांच्या नजरेत आला तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यानं 609 धावा केल्या होत्या. त्यानंतर सैशय मुश्ताक अली ट्राफीमध्येही त्यानं 92 धावांची जबरदस्त खेळी होती.

आरसीबीकडून केवळ देवदत्तच नाही ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जोश फिलिपीही पदार्पण करत आहे. तर हैदराबादकडून भारती अंडर-19 वर्ल्ड कपचा कर्णधार प्रियम गर्ग पदार्पण करणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading