Home /News /sport /

IPL 2020 : रोहित शर्माची 9 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली

IPL 2020 : रोहित शर्माची 9 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबईची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी चेन्नई (CSK)ने कोलकाता (KKR)चा पराभव केल्यानंतर मुंबईने प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबईची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी चेन्नई (CSK)ने कोलकाता (KKR)चा पराभव केल्यानंतर मुंबईने प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला. या हंगामात मुंबईने 12 पैकी 8 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने मोलाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे खेळत नसला, तरी सूर्याने रोहितची कमी कुठेही भासून दिली नाही. मुंबईकडून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादव क्विंटन डिकॉकनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमारने या मोसमातल्या 12 मॅचच्या 11 इनिंगमध्ये 40.22 च्या सरासरीने आणि 155.36 च्या स्ट्राईक रेटने 362 रन केल्या आहेत. सूर्यकुमारने या मोसमात 3 अर्धशतकंही केली आहेत. सूर्यकुमार यादवच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच रोहित शर्माने 9 वर्षांपूर्वी त्याच्याविषयी केलेली भविष्यवाणी आता खरी ठरत आहे. 10 डिसेंबर 2011 साली रोहित शर्माने हे ट्विट केलं होतं. 'चेन्नईमध्ये बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा नुकताच संपला आहे. काही नवोदित क्रिकेटपटू येत आहेत. मुंबईच्या सूर्यकुमार यादवकडे लक्ष ठेवा, तो भविष्य आहे,' असं ट्विट रोहित शर्माने केलं होतं. सूर्यकुमार यादव गेली काही वर्ष फक्त आयपीएलच नाही, तर स्थानिक क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये त्याची निवड होईल, असं बोललं जात होतं, पण त्याला संधी मिळाली नाही, यानंतर मोठा वाद निर्माण झाला. हरभजन सिंग आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गज क्रिकेटपटूंनी निवड समितीवर सूर्यकुमारला संधी न दिल्यामुळे टीका केली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या