IPLमध्ये धोनी, रोहित आणि विराट एकाच टीममध्ये खेळणार! गांगुलीचा मास्टर प्लॅन

IPLमध्ये धोनी, रोहित आणि विराट एकाच टीममध्ये खेळणार! गांगुलीचा मास्टर प्लॅन

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! या दिवशी धोनी, रोहित आणि विराट एकाच संघाकडून खेळणार.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जानेवारी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंडियन प्रीमियर लीगने (IPL) तेराव्या हंगामासाठी एक नवीन प्लॅन तयार केला आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकाच संघाकडून खेळतील. हा सामना आयपीएलच्या तीन दिवस आधी खेळला जाऊ शकतो, याची तयारी BCCIने केली आहे. आयपीएल 2020 चा पहिला सामना 29 मार्च रोजी खेळला जाणार आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने दिल्लीत झालेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात आता 8 संघांमधील खेळाडू एकाच वेळी एकाच सामन्यात मैदानात उतरतील असा विचार केला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच होईल जेव्हा या स्पर्धेपूर्वी चॅरिटी सामना आयोजित केला जाईल. आयपीएल चॅरिटी सामना 26 मार्च रोजी झालेल्या आयपीएल सामन्याच्या 3 दिवस आधी खेळला जाऊ शकतो, ज्यामध्ये सर्व दिग्गज एकत्र दिसणार आहे.

वाचा-यंदाच्या IPL 2020 मध्ये लागू होणार नवीन नियम, सौरभ गांगुलींनी केली घोषणा

असा आहे BCCIचा प्लॅन

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने या चॅरिटी सामन्यासाठी दोन संघ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एक संघ उत्तर आणि पूर्व भारत असेल तर दुसर संघ दक्षिण आणि पश्चिम भारत असेल. त्यामुळं एका संघात दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेवन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट राइडर्सचे खेळाडू असतील. तर, दुसऱ्या संघात चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियंस, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराइजर्स हैदराबादचे खेळाडू असतील. ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार हा मास्टर प्लॅन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा आहे.

वाचा-IPL 2020 चा अंतिम सामना मुंबईतच, या तारखेला रंगणार फायनल

धोनी, विराट आणि रोहित एकाच संघातून खेळणार

या ऑल स्टार क्रिकेट संघात दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसतील. त्यामुळं या सामन्यांमध्ये विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, जसप्रीत बुमराह, शेन वॉटसन, हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगासारखे दिग्गज एकत्र खेळताना दिसतील.

वाचा-न्यूझीलंडमध्ये आणखी एक विजय आणि विराटसेना रचणार इतिहास!

IPLमध्ये आले नवे नियम

आयपीएल (Indian Premier League) च्या नवीन सीझनमध्ये कनेक्शन सबस्टिट्यूट नियम लागू होणार आहे. जर एखाद्या खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना दुखापत झाली तर तो सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याची जागी दुसरा खेळाडू घेईल. याला कनेक्शन नियम म्हटले जाते.इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या स्पर्धा 29 मार्चला सुरू होणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होईल, अशी माहितीही सौरव गांगुली यांनी दिली. आयपीएलच्या 13 व्या हंगामात वेळी झालेल्या बैठकीत अंतिम सामना मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यंदा एकाच दिवशी दोन सामने खेळवण्याचे प्रमाणही कमी केले आहे. तसंच डे-नाइट सामन्याच्या वेळेतबाबतही निर्णय घेतला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: IPL 2020
First Published: Jan 29, 2020 09:24 AM IST

ताज्या बातम्या