मुंबई, 26 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या 195 धावांचा पाठलाग करत राजस्थानाने 8 विकेट राखत मुंबईचा पराभव केला. या सामन्यात बेन स्टोक्स (ben stokes) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. पण य सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा काहीही संबंध नसताना सोशल मीडियावर मात्र तो ट्रोल होत आहे. पंत हा खरं तर दिल्लीचा खेळाडू. मग त्याचा मुंबई विरुद्ध पंजाबच्या सामन्याची काय संबंध?
संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोघेही भारतीय संघामध्ये जागा मिळवण्याचे प्रबळ दावेदार आहेत. पण आतापर्यंत ऋषभ पंत याला आपल्या प्रतिभेला साजेसा खेळ करण्यात अपयश आले आहे. या IPL मध्ये त्याने आठ सामन्यांमध्ये 31 च्या सरासरीने केवळ 217 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विकेट किपिंगमध्येदेखील त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे.
दुसरीकडे संजू सॅमसन याने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये शानदार अर्धशतकी खेळी केल्यानंतर संजू सॅमसन मागील काही सामन्यांपासून अडखळत होता. पण कालच्या सामन्यात त्याने बेन स्टोक याच्याबरोबर शानदार 152 धावांची पार्टनरशिप करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात संजू सॅमसन याने 31 बॉलमध्ये नाबाद 54 धावा केल्या. तर बेन स्टोक याने 60 बॉलमध्ये नाबाद 107 धावा केल्या. सॅमसन याने या सामन्यात धावा केल्यानंतर सोशल मीडियावर रिषभ पंत चर्चेचा विषय ठरला आहे.
Sanju Samson is better than Rishabh Pant.
— Narayanan (@visaraj) October 26, 2020
ट्विटरवर पंत याला ट्रोल केले जात असून सॅमसनच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
Everyone in the commentary box up and clapping this 50 by @IamSanjuSamson. Very pleasant player to watch
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 25, 2020
ट्विटरवर काहींनी मिम्स टाकले आहेत. एक जण म्हणतो, ‘संजूची खेळी जबरदस्त होती. पंतनी आता हलवा पुरी खायला परत जायला हवं,’ दुसरा म्हणतो, ‘रिषभ पंत हा ओव्हररेटेड आहे त्याचा पर्याय संजू सॅमसन सर्वोत्तम आहे.’
⚠️ Assemble, Memers! ⚠️
🗓️: 26-10-2020, Monday | ⌚: 12:00 AM
Deadline day for the #YeMainKarLetaHoon contest is upon us, Make sure you send in your entries on time to stand a chance to win a voucher worth Rs.5000! 😍#Dream11 #YeApnaGameHai #ContestAlert pic.twitter.com/2GtHlM44MV
— Dream11 (@Dream11) October 25, 2020
Meanwhile Sanju Samson to Rishabh Pant#BestHomeCommentator@Housing pic.twitter.com/DmSN5jDcer
— Varshini Vinod 😊🇮🇳 (@VSounder19) October 25, 2020
दरम्यान, संजू सॅमसन याने या आयपीएलमध्ये आतापर्यंत 30 च्या सरासरीने आणि 158 च्या स्ट्राईक रेटने 326 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 अर्धशतकांचा देखील समावेश आहे.