मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 RCB vs RR: 6 6 6 1 Wd 4 1! तीन ओव्हरमध्ये हवे होते 45 रन्स, 6 चेंडूत असा फिरला सामना; पाहा VIDEO

IPL 2020 RCB vs RR: 6 6 6 1 Wd 4 1! तीन ओव्हरमध्ये हवे होते 45 रन्स, 6 चेंडूत असा फिरला सामना; पाहा VIDEO

या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
दुबई, 18 ऑक्टोबर : गेल्या 12 वर्षांचा दुष्काळ यंदा रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा (Royal Challengers Banglore) संपवेल असे चित्र सध्या दिसत आहे. या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गेल्या हंगामात तळाला असणारा हा संघ यावेळी प्ले ऑफ गाठणार हे निश्चित आहे. शनिवारी राजस्थान विरुद्ध झालेला सामना RCBनं 7 विकेटनं जिंकला. एबी डिव्हिलियर्स ( AB De Villiers) ने पुन्हा एकदा वादळी खेळी करून बँगलोर (RCB)ला जिंकवून दिलं आहे. राजस्थान (Rajasthan Royals)ने दिलेल्या 178 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरची अवस्था कठीण झाली होती, मात्र एबीने 22 चेंडूत नाबाद 55 रन करुन बँगलोरचा विजय सोपा केला. एबीच्या या खेळीमध्ये तब्बल 6 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. बॅंगलोरला शेवटच्या तीन ओव्हरमध्ये 45 धावांची गरज होती. सामना राजस्थान जिंकेल असे वाटत असताना 19व्या ओव्हरनं सामन्याचं रुप पालटलं. वाचा-प्ले ऑफ गाठणारे 3 संघ फिक्स, एका जागेसाठी 5 दावेदार; कोण मारणार बाजी? 19वी ओव्हर कर्णधार स्टीव्ह स्मिथनं जयदेव उनाडकटला दिली. मात्र या एका ओव्हरमध्ये एबीनं 25 धावा कुटल्या. 3 सिक्स आणि एक फोर मारत 6 चेंडूत राजस्थानचा हातचा विजय खेचून आणला. वाचा-IPL 2020 : ब्रायन लारा म्हणतो, 'ही आहे आयपीएलची सर्वोत्तम टीम' या मॅचमध्ये राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या मोसमात फॉर्मसाठी झगडणाऱ्या स्मिथला या मॅचमध्ये सूर गवसला. त्याने 36 बॉलमध्ये 57 रन करुन राजस्थानला 177 रनपर्यंत पोहोचवलं. राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. वाचा-IPL 2020 : सेहवाग म्हणतो, 'हा खेळाडू कोरोनाची लसही बनवू शकतो' यंदाच्या आयपीएलमध्ये संघर्ष करणाऱ्या एरॉन फिंचला या मॅचमध्येही मोठा स्कोअर करता आला नाही. कर्णधार विराट कोहलीने 32 बॉलमध्ये 43 रन केले. विराटची विकेट गेल्यानंतर बँगलोरला हे आव्हान कठीण जाईल, असं वाटत होतं, पण बँगलोरने 19व्या ओव्हरमध्ये उनाडकटला 25 रन काढले. एबीने या ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
First published:

Tags: Cricket, RCB

पुढील बातम्या