Home /News /sport /

Mr. 360 ने केली कमाल! असा सिक्सर मारला की शारजामध्ये झालं ट्रॅफिक जाम, पाहा VIDEO

Mr. 360 ने केली कमाल! असा सिक्सर मारला की शारजामध्ये झालं ट्रॅफिक जाम, पाहा VIDEO

एबी डिव्हिलियर्सने (AB De villiers) 33 चेंडूत 73 धावांची जबरदस्त खेळी करत कोलकाताला 82 धावांनी पराभूत केले.

    शारजा, 13 ऑक्टोबर : आयपीएलच्या 28वा सामना रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झाला. एबी डिव्हिलियर्सने (AB De villiers) 33 चेंडूत 73 धावांची जबरदस्त खेळी करत कोलकाताला 82 धावांनी पराभूत केले. यासह बॅंगलोरचा संघ 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. एबीनं या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात एबीनं विस्फोटक फलंदाजी केली. एबीच्या या फलंदाजीमुळे काहीकाळ शारजाहमध्ये ट्रॅफिकही जाम झाले होते. डिव्हिलियर्सनं 33 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि 6 षटकार लगावले. दोन षटकार तर स्टेडियमवर बाहेर जाऊन गाड्यांवर आदळले. वाचा-आता चॅलेंजर्स पडणार पलटनवर भारी? RCBच्या विजयानं गुणतालिकेत झाला मोठा बदल वाचा-छोट्या गावचा मुलगा अन् पैलवानाचा नातू, आता झाला IPLमधला मॅन विनर खेळाडू एबी क्रिझवर होता तेव्हा RCBचा स्कोअर 94 धावा होता. कर्णधार विराट कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी 7.4 ओव्हरमध्ये नाबाद 100 धावांची भागीदारी करत 194 धावांचे लक्ष उभे केले. चा पाठलाग करताना कोलकाताची हालत खराब झाली. 20 ओव्हरमध्ये कोलकातानं केवळ 112 धावा केल्या. या सामन्यात एबीनं षटकारांचा पाऊस पाडला. एबीनं 16व्या ओव्हरमध्ये कमलेश नागरकोटीला लॉग ऑनला जबरदस्त षटकार मारला. तर दुसऱ्याच चेंडूवर त्यानं मारलेल्या षटकारानं रस्त्यावरील गाड्या थांबल्या. वाचा-राजस्थानच्या विजयापेक्षा रियान परागच्या ‘त्या’ VIDEOची सगळेकडे चर्चा कोलकाताला हरवत बंगळुरूनं 2 गुण मिळवले आहेत. गेल्या 12 वर्षात एकदाही बॅंगलोर संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही आहे. त्यामुळे यंदा आरसीबी शानदार खेळी करत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. RCBचा संघ आता दिल्ली आणि मुंबईला टक्कर देत आहे. RCBनं 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 2 गमावले आहेत. 10 गुणांसह RCBचा नेट रन रेट -0.116 आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: RCB

    पुढील बातम्या