Home /News /sport /

एक नंबर जोडी! डिव्हिलिअर्स आणि विराटने शतकी भागीदारीसोबत केला 'हा' विक्रम

एक नंबर जोडी! डिव्हिलिअर्स आणि विराटने शतकी भागीदारीसोबत केला 'हा' विक्रम

विराट कोहली आणि डिव्हिलिअर्समध्ये तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी देखील झाली.

    शारजा, 13 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा या सामन्यात KKRचा 82 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात ए. बी. डिव्हिलिअर्सच्या जोरदार 73 धावांच्या जोरावर कोहलीच्या संघाने हा विजय मिळवला. या सामन्यात डिव्हिलिअर्सने 33 चेंडूत नाबाद 73 धावा करत आपल्या संघाला 194 धावा उभ्या करून दिल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकात्याला केवळ 112 धावाच करता आल्या. या सामन्यात केवळ डिव्हिलिअर्सची खेळीचं महत्त्वपूर्ण ठरली नसून विराट कोहली आणि डिव्हिलिअर्समध्ये तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी देखील झाली. याचबरोबर या दोघांनी आयपीएलमध्ये आपल्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. दोघांनी या 7.4 ओव्हरमध्ये नाबाद 100 धावांची भागीदारी केली. वाचा-Mr. 360 ने केली कमाल! असा सिक्सर मारला की शारजामध्ये झालं ट्रॅफिक जाम या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बॅंगलोरने 2 विकेट गमावत 192 धावा केल्या. यामध्ये कोहली आणि डिव्हिलिअर्सने केवळ 47 बॉलमध्ये 100 धावांची भागीदारी केली. या भागीदारीबरोबरच कोहली आणि डिव्हिलिअर्स यांनी सर्वाधिक वेळा आयपीएलमध्ये शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. या दोघांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजेच 10 वेळा शतकी भागीदारी केली आहे. या सामन्यात डिव्हिलिअर्सने पाच चौकार आणि सहा खणखणीत षटकार ठोकले. त्याचबरोबर कोहली आणि डिव्हिलिअर्सने या सामन्यात 3 हजार धावांची भागीदारीदेखील पूर्ण केली आहे. वाचा-आता चॅलेंजर्स पडणार पलटनवर भारी? RCBच्या विजयानं गुणतालिकेत झाला मोठा बदल आयपीएलच्या इतिहासात सार्वधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या 10 - विराट कोहली आणि एबी डिविलिअर्स 9 - विराट कोहली आणि क्रिस गेल 6 - शिखर धवन आणि डेविड वॉर्नर 5 - जॉनी बेअरस्टो आणि डेविड वॉर्नर 5 - गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा RCBची शानदार कामगिरी गेल्या 12 वर्षात एकदाही बॅंगलोर संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही आहे. त्यामुळे यंदा आरसीबी शानदार खेळी करत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. RCBचा संघ आता दिल्ली आणि मुंबईला टक्कर देत आहे. RCBनं 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 2 गमावले आहेत. 10 गुणांसह RCBचा नेट रन रेट -0.116 आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: RCB

    पुढील बातम्या