2 संघांचा नेट रन रेट टाय झाल्यास काय होणार? वाचा IPLचा नियम 16.10.2.3

आज दिल्ली आणि बॅंगलोर यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याचा निकाल एका संघाला प्लेऑफमध्ये निश्चित स्थान मिळवून देईल.

आज दिल्ली आणि बॅंगलोर यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याचा निकाल एका संघाला प्लेऑफमध्ये निश्चित स्थान मिळवून देईल.

  • Share this:
    नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या (IPL 2020) हंगामात सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे ते प्लेऑफ (Playoff) गाठणाऱ्या संघांकडे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्ले ऑफ गाठणार एकमेव संघ ठरला आहे. आता खरी लढत ही रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC ), कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे. हैदराबाद वगळता इतर तिन्ही संघाचे सध्या 14 गुण आहेत. आज दिल्ली आणि बॅंगलोर यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याचा निकाल एका संघाला प्लेऑफमध्ये निश्चित स्थान मिळवून देईल. या सामन्यानंतर कोणता संघ क्वालिफाय होणार हे स्पष्ट होईल. सध्या या संघांमध्ये रनरेटचा खेळ आहे. 14 गुण असेलल्या या तिन्ही संघांचा रनरेट मायनसमध्ये आहे. 12 गुण असलेल्या हैदराबादचा रन रेट (0.555) प्लसमध्ये आहेत. त्यामुळे बॅंगलोरचा मोठ्या फरकानं आजचा सामना जिंकावा लागेल. मात्र जर दोन संघांचा रन रेट टाय झाला तर काय होणार? वाचा-हो हे शक्य आहे! आज RCB आणि दिल्ली दोघंही गाठणार प्लेऑफ नेट रन रेटबाबत असा आहे IPLचा नियम सध्या गुणतालिकेत RCB 14 गुणांसह -0.145 रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्लीकडेही 14 गुण आहेत. मात्र त्यांचा रन रेट -0.159 आहे. दिल्ली आणि बॅंगलोर यांच्यात नेट रन रेटचा जास्त फरक नाही आहे. तर, KKRचा रन रेट -0.214 आहे. आज दिल्ली विरुद्ध बॅंगलोर यांच्यातील सामन्यात पराभूत संघाचा रन रेट जर -0.214 झाला तर IPL आणि BCCIच्या 16.10.2.3 नियमानुसार ज्या संघानं या हंगामात सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत. तो संघ क्वालिफाय होईल. सध्या दिल्ली कॅपिटल्सनं 77, RCB 73 आणि कोलकाता 68 विकेट आहेत. म्हणजे नेट रन रेट टाय झाल्यास कोलकाता क्वालिफाय होऊ शकत नाही. वाचा-खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल! ...तरच KKR गाठू शकते प्लेऑफ कोलकाता (KKR)विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा 60 रनने पराभव झाला. त्यामुळे 14 गुणांसह कोलकाताचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र आज क्वालिफाय होण्यासाठी दिल्ली विरुद्ध बॅंगलोर यांच्यात सामन्यात 22 किंवा त्याहून अधिक धावांनी बॅंगलोरनं सामना गमावणं किंवा दिल्लीनं 18 किंवा त्याहून अधिक धावांनी सामना गमावणं गरजेचं आहे. जर, या दोन्ही संघांनी या धावांपेक्षा कमी धावांनी सामना गमावला तर दोन्ही संघ आज प्लेऑफसाठी क्वालिफाय होतील. त्यानंतर KKRला मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published: