मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 RCB vs CSK: अरे भागो! वॉशिंग्टन सुंदरच्या सिक्सला घाबरला चहल, ड्रेसिंग रुममध्ये पळत सुटला; पाहा मजेदार VIDEO

IPL 2020 RCB vs CSK: अरे भागो! वॉशिंग्टन सुंदरच्या सिक्सला घाबरला चहल, ड्रेसिंग रुममध्ये पळत सुटला; पाहा मजेदार VIDEO

IPL 2020 RCB vs CSK: फलंदाजी करताना वॉशिंग्टननं एक जबरदस्त सिक्सर मारला. हा सिक्स एवढा लांब गेला की RCBच्या ड्रेसिंग रुममध्ये बसलेले खेळाडू घाबरले.

  • Published by:  Priyanka Gawde

दुबई, 11 ऑक्टोबर : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (Royal Challengers Bangalore, RCB) संघासाठी आयपीएलचा 13वा हंगाम (IPL 2020) चांगला राहिला आहे. RCBने आतापर्यंत सहा पैकी चार सामने जिंकले आहे. यासह पॉइंट टेबलमध्ये RCBचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. RCBनं शनिवारी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings, CSK) संघाला 37 धावांनी नमवले. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त गोलंदाजी केली. सुंदरने 3 ओव्हरमध्ये 16 धावा देत 2 विकेट घेतल्या. मात्र फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजीमध्येही वॉशिंग्टननं जबरदस्त कामगिरी केली.

फलंदाजी करताना वॉशिंग्टननं एक जबरदस्त सिक्सर मारला. हा सिक्स एवढा लांब गेला की RCBच्या ड्रेसिंग रुममध्ये बसलेले खेळाडू घाबरले. फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलतर ड्रेसिंग रुमच्या आत पळून गेला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-IPL 2020 : चेन्नईचा पराभव, पण धोनीच्या नावावर झाला आणखी एक विश्वविक्रम

प्रथम फलंदाजी करताना पहिल्या 12 ओव्हरमध्ये RCB संघाने केवळ 69 धावा केल्या. संघाला धावांची गरज होती, तेव्हा मैदानावर वॉशिंग्टन सुंदर आणि विराट कोहली उपस्थित होते. सुंदरने चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माला लॉग ऑनवर जबरदस्त सिक्सर मारला. हा सिक्स थेट RCBच्या ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीमध्ये गेला. चेंडू येताना पाहूनच चहल ड्रेसिंगमध्ये आत पळून गेला. चहलला पळताना पाहून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स तयार केले जात आहेत.

वाचा-'हे' 4 संघ ठरणार प्ले ऑफसाठी पात्र; पाहा तुमची आवडची टीम आहे कोणत्या स्थानी

वाचा-IPL 2020 : चेन्नईचा आता बैंगलोरकडून धुव्वा, विराट-मॉरिस चमकले

दरम्यान, बँगलोरने ठेवलेल्या 170 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 132 रनपर्यंतच मजल मारता आली. बँगलोरने दिलेलं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात या मॅचमध्येही खराब झाली. ओपनर फाफ डुप्लेसिस आणि शेन वॉटसन स्कोअरबोर्डवर 25 रन असतानाच माघारी परतले. यानंतर रायुडू आणि जगदीसन यांनी चेन्नईचा डाव सावरायला सुरुवात केली, पण त्यांना मोठी मजल मारता आली नाही.

First published: