प्लेऑफआधी विराटला सगळ्यात मोठा झटका, बाहेर होऊ शकतो सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज

प्लेऑफआधी विराटला सगळ्यात मोठा झटका, बाहेर होऊ शकतो सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज

RCB संघाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. संघातील स्टार गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्च बॅंगलोर (Royal Challengers Bangaore) यावर्षी प्लेऑफ (Playoff) गाठण्याच्या एकदम जवळ आहे. बॅगलोरनं चेन्नईविरुद्ध सामना गमावसा असला तरी 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यातच RCB संघाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. संघातील स्टार गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर बसण्याची शक्यता आहे. हा गोलंदाज आहे नवदीप सैनी.

रविवारी चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात नवदीप सैनीच्या अंगठ्याला दुखापत झाली. RCBचे मुख्य फिजियोथेरेपिस्ट इव्हान स्पीचलीने सांगितले की, नवदीपच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 18व्या ओव्हरमध्ये बाहेर जावे लागले. मात्र इव्हान यांनी सैनी फिट आहे की नाही, याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे सांगितले.

इव्हान यांनी सांगितले की, ''नवदीप सैनीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्या अंगठ्याला टाकेही बसले आहे. आमच्याकडे सर्जन आहेत, जे त्याच्यावर उपचार करत आहेत. आम्ही त्याला सध्या मॉनिटर करत आहेत. त्यानंतर ठरवले जाईल की पुढचा सामना खेळण्यासाठी सैनी तयार आहे की नाही".

वाचा-'...तर सनरायजर्स हैदराबाद अजूनही प्लेऑफ गाठू शकतो', वॉर्नरनं सांगितला प्लॅन

वाचा-हा तर पोलार्डचा भाऊ! आर्चरनं घेतला जबरदस्त कॅच, मैदानावरील सर्व खेळाडू शॉक

चार-पाच वर्षांपर्वी विराटलाही अशीच दुखापत झाली होती. मात्र नवदीप सैनीची दुखापत गोलंदाजी वाल्या बोटावरच आहे. त्यामुळे त्याला सीम पकडता येऊ शकते की नाही हे पाहिले जाईल. सध्या नवदीपवर उपचार केले जात आहेत.

वाचा-IPL 2020 : आयपीएलच्या 8 टीमकडून खेळला तरी चमकला नाही, यंदाही संघर्ष सुरूच

दरम्यान, बँगलोर (RCB)ने दिलेलं 146 रनचं आव्हान चेन्नईने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड 51 बॉलमध्ये 65 रनवर आणि एमएस धोनी 21 बॉलमध्ये 19 रनवर नाबाद राहिला. बँगलोरकडून सिराज आणि चहलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दुसरीकडे बँगलोरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बँगलोरने 11 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. बॅंगलोरचा पुढचा सामना बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 26, 2020, 3:05 PM IST

ताज्या बातम्या