Home /News /sport /

IPL 2020: आता धोनी नाही तर हा खेळाडू आहे चेन्नईचा नवा फिनिशर, कोलकात्याकडून खेचून आणला विजय

IPL 2020: आता धोनी नाही तर हा खेळाडू आहे चेन्नईचा नवा फिनिशर, कोलकात्याकडून खेचून आणला विजय

कोलकाताविरुद्ध रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने 11 चेंडूत 31 धावा केल्या. चेन्नईने 6 विकेट्सने KKR ला हरवून त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशेला धक्का पोहोचवला आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ जरी आयपीएल 2020 (IPL 2020) मधून बाहेर पडला असला तरी गेल्या दोन सामन्यांपासून ते उत्तम खेळत आहेत. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जने कोलकत्ता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सने 173 धावा केल्या. या सामन्यात एक वेळ अशी होती की कोलकत्ता नाइट रायडर्सचा विजय निश्चित होता. परंतु रवींद्र जडेजाने अवघ्या सात चेंडूंमध्ये 400च्या तुफानी स्ट्राइक रेटने धावा बनवून सामना पलटवला. रवींद्र जडेजाची दमदार कामगिरी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जेव्हा क्रीजवर आला तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक सेट झालेला फलंदाज ऋतुराज गायकवाडची विकेट गमावली होती. यानंतर जडेजाने 18 व्या ओवरमध्ये फक्त 4 धावा केल्या आणि चेन्नईला 2 ओव्हरमध्ये 30 धावा हव्या होत्या. समस्या अशी होती की सॅम करन चेंडू योग्यप्रकारे हिट करत नव्हता. त्याच वेळी जडेजाने हिंमत दाखवली आणि संघाला विजय मिळवून दिला. फर्ग्यूसनच्या ओव्हरमध्ये 2 चौकार 1 षटकार आयपीएलमधील वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या फर्ग्यूसनवर केकेआरने विश्वास टाकला. त्याने त्याच्या पहिल्या 3 चेंडूंमध्ये केवळ दोन रन्स दिल्या. त्यानंतर जडेजाने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. फर्ग्युसनने पुढचा चेंडू नोबॉल टाकला त्यावर जडेजाने 2 धावा केल्या. नोबॉलमुळे मिळालेल्या फ्री हीटवर जडेजाने षटकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारत एका ओवरमध्ये 20 धावा केल्या. (हे वाचा-धोनीला बोल्ड केल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घेण्यासाठी पोहोचला वरुण चक्रवर्ती) शेवटची रोमांचक ओव्हर केकेआरने वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीला शेवटची ओव्हर दिली. त्यावेळी पहिल्या 3 चेंडूत फक्त 3 धावा झाल्या. शेवटचा 2 चेंडूंमध्ये चेन्नईला 7 धावांची आवश्यकता होती आणि त्यानंतर जडेजाने मिडविकेटवर अत्यंत लांब षटकार मारला. त्याचवेळी शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक होती आणि जडेजाने पुन्हा एकदा षटकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. (हे वाचा-भारत सोडून या देशाकडून खेळणार सूर्यकुमार? क्रिकेट खेळण्यासाठी मिळाली ऑफर) या सामन्याच्या शेवटच्या दोन ओव्हरमधील पहिल्या चार चेंडूत जडेजाने 3 धावा केल्या आणि पुढच्या सात चेंडू त्याने 28 धावा केल्या. अशाप्रकारे 31 धावा करुन जडेजाने केवळ आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर तो स्वतःला चेन्नईचा नवीन मॅच फिनिशर असल्याचं दाखवून दिलं.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IPL 2020, Ravindra jadeja

    पुढील बातम्या