Home /News /sport /

जमिनीवर डोकं आपटलं पण त्यानं चेंडू नाही सोडला! पाहा संजू सॅमसनचा जबरदस्त कॅच VIDEO

जमिनीवर डोकं आपटलं पण त्यानं चेंडू नाही सोडला! पाहा संजू सॅमसनचा जबरदस्त कॅच VIDEO

कोलकाताकडून युवा गोलंदाजांनी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र संजू सॅमसननं घेतलेला जबरदस्त कॅच अजूनही लोकांच्या डोक्यातून जात नाही आहे.

    दुबई, 01 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामना राजस्थाननं गमावला असला तरी या सामन्यात एक थरारक प्रसंग पाहायला मिळाले. दोन्ही संघांनी उत्तम गोलंदाजी केली. कोलकाताकडून युवा गोलंदाजांनी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र संजू सॅमसननं घेतलेला जबरदस्त कॅच अजूनही लोकांच्या डोक्यातून जात नाही आहे. राजस्थाननं या सामन्यात टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. 18व्या ओव्हरमध्ये टॉम कुरनच्या चेंडूवर संजूनं पॅट कमिन्सचा शानदार कॅच घेतला. कुरेनच्या चेंडूवर कमिन्स मोठा शॉट खेळायला गेला. मात्र डीप बॅकवर्ड स्‍क्‍वेअर लेगवर असलेल्या सॅमसननं हवेत उडी मारल कॅच घेतला. मात्र हातात चेंडू असताना संजूचा तोल गेल आणि त्याचं डोकं जमिनीवर जोरात आपटलं. मात्र असं होऊनही संजूनं कॅच सोडला नाही. कॅच पकडल्यानंतर जमिनीवर पडला, तेव्हाच त्याचं डोकं जोरात आपटलं. मात्र डोक्याला मार लागूनही संजूनं कॅच सोडला नाही. लगेचच मेडिकल टीमनं संजूची तपासणी केली. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली नाही. संजूच्या या कॅचची दखल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही घेतली. तेंडुलकरनं ट्वीट करत सॅमसनचं कौतुक केलं. दरम्यान, या सामन्यात शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांच्या बॉलिंगपुढे राजस्थानचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले. शिवम मावीने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर कमलेश नागरकोटीला 2 ओव्हरमध्ये 13 रन देऊन 2 विकेट मिळाल्या. वरुण चक्रवर्तीनेही 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन राजस्थानच्या 2 खेळाडूंना माघारी धाडलं. सुनील नारायण, पॅट कमिन्स आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. कोलकात्याने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर 42 रन असतानाच राजस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या