शारजाह, 22 सप्टेंबर : शारजाहमध्ये आज राजस्थान विरुद्ध चेन्नई (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात सामना होणार आहे. मात्र सर्वांचे लक्ष आहे ते एका मुंबईकर खेळाडूवर. हा मुंबईकर खेळाडू आयपीएलआधीच चर्चेत आला. लिलावात राजस्थाननं या खेळाडूला 2.40 कोटींना विकत घेतले. हा खेळाडू आहे मुंबईकर फलंदाज यशस्वी जयस्वाल (yashasvi jaiswal). यशस्वी आज राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.
यशस्वी सर्वांच्या नजरेत आला जेव्हा दुहेरी शतक करणारा तो जगातला सर्वात लहान खेळाडू ठरला. त्यानंतर त्यानं विजय ट्रॉफीमध्ये एका सामन्यातील पहिल्या डावात सर्वात जास्त 12 षटकार लगावण्याची कामगिरी त्यानं केली आहे. यशाच्या शिखरावर असतानाच अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड झाली. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये यशस्वीला राजस्थान रॉयल्स संघानं 2.40 कोटींना विकत घेतलं. मात्र पाणीपुरी विक्रेता ते क्रिकेटर असा यशस्वीचा प्रवास मन सुन्न करणारा आहे.
वाचा-RR vs CSK Live : चेन्नईने टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय
First of many, for many! 💗
Views on our Playing XI? 👀#RRvCSK | #HallaBol | #Dream11IPL | #IPL2020 pic.twitter.com/u6EbP5jgp1
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 22, 2020
वाचा-राजस्थानला मोठा धक्का, संघातील दोन स्टार खेळाडू खेळणार नाहीत पहिला सामना!
11व्या वर्षी मुंबईत आला पण...
वयाच्या 11व्या वर्षी उत्तर प्रदेशमधील भदोही इथून क्रिकेटर व्हायचे स्वप्न उराशी बाळगून मायानगरी मुंबईत आला. यशस्वीचे काका वरळी येथे राहत होते, मात्र त्यांचे घर छोटे असल्याचे सांगून त्यांनी यशस्वीची सोय आझाद मैदान येथील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये केली. मात्र दिवसभर क्रिकेट खेळल्यामुळे यशस्वी रात्री तिथेच झोपायचा. त्यांच्या कोणत्याच कामात मदत होत नसल्यामुळे त्यांनी एक दिवस त्याचं संपूर्ण सामान डेरीच्या बाहेर फेकून दिलं. अखेर राहण्याची सोय हवी म्हणून तो आझाद मैदान येथील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये आला.
वाचा-20 लाखांना विकत घेतलेल्या 'या' युवा फलंदाजानं उडवली SRHची झोप
उदरनिर्वाहासाठी विकू लागला पाणीपुरी
मुंबईत आला खरा मात्र यशस्वीला स्वतःचा उदरनिर्वाह करायचा होता. यासाठी त्यानं पाणीपुरी विकण्यास सुरुवात केली. यशस्वीच्या आयुष्यात असेही दिवस आले जेव्हा तो उपाशी पोटी झोपायचा. तसेच तो जिथे राहायचा तिथे बाथरूमची सोय नसल्यामुळे तो फॅशन स्ट्रीटला बाथरूमसाठी जायचा. अनेकदा मेणबत्तीच्या प्रकाशात तो जेवायचा. अनेक रात्री त्याला घरच्यांची आठवण यायची आणि तो ओक्शाबोक्शी रडायचा. पण काहीही झालं तरी रिकाम्या हाती घरी जायचं नाही असंच त्याने ठरवलं होतं.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड मिलर, रियान पराग, श्रेयस गोपाळ, टॉम कुरन, राहुल तेवातिया, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट