शारजाह, 22 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामातील चौथा सामना आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. या सामन्यात सिनिअर vs ज्युनिअर असा सामना पाहायला मिळेल. कारण, राजस्थान संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे तर चेन्नई संघात अनुभवी खेळाडू जास्त आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाचा हा पहिला सामना असेल तर चेन्नईनं यायाधी मुंबईचा नमवत विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे राजस्थानसमोर चेन्नईला हरवण्याचे आव्हान असणार आहे. चेन्नईकडून अंबाती रायडू आणि फाफ ड्यु प्लेसिस चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर, राजस्थानचे दोन स्टार खेळाडू जॉस बटलर आणि बेन स्टोक्स पहिला सामना खेळणार नाही आहेत
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील सामना शारजाहच्या शेख जैयद स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
किती वाजता सुरू होणार सामना ?
भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. याआधी 7 वाजता टॉस होईल.
येथे पाहा सामन्याचा LIVE टेलिकास्ट
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (star sports network) वर पाहता येणार आहे.
येथे पाहू शकता ऑनलाईन
जर तुम्हाला ऑनलाइन सामना पाहायचा असल्याच तुम्ही डिज्नी हॉटस्टार अॅपवर (Disney Hotstar VIP) पाहू शकता.