IPL 2020 RR vs CSK Live : राजस्थाननं 16 धावांनी जिंकला सामना, फाफची खेळी व्यर्थ

IPL 2020 RR vs CSK Live : राजस्थाननं 16 धावांनी जिंकला सामना, फाफची खेळी व्यर्थ

राजस्थानकडून राहुल तेवातियानं 3 विकेट घेत चेन्नईला आक्रमक फलंदाजीची संधी दिली नाही. तर चेन्नईकडून फाफनं 21 चेंडूत 77 धावा केल्या. मात्र फाफला चांगली साथ मिळाली नाही.

  • Share this:

शारजाह, 22 सप्टेंबर : राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेल्या सामना चेन्नईनं 16 धावांनी गमावला. राजस्थाननं दिलेल्या 217 धावांचे आव्हान चेन्नईला पार करता आले नाही. चेन्नईनं 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या. राजस्थाननं जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी करत विजय मिळवला. राजस्थानकडून राहुल तेवातियानं 3 विकेट घेत चेन्नईला आक्रमक फलंदाजीची संधी दिली नाही. तर चेन्नईकडून फाफनं 21 चेंडूत 77 धावा केल्या. मात्र फाफला चांगली साथ मिळाली नाही. धोनीनं अखेरच्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारले मात्र तोपर्यंत चेन्नईलं सामना गमावला होता.

चेन्नईनं टॉस जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला युवा गोलंदाज यशस्वी जयस्वालला लवकर बाद करण्यात यश आले. मात्र त्यानंतर फलंदाजीस आलेल्या संजू सॅमसननं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. संजू सॅमसननं आक्रमक फलंदाजी करत केवळ 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यात 1 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. संजू आणि स्मिथ यांनी 121 धावांची भागीदारी केली. मात्र 74 धावांवर लुंगी नग्धीनं संजू सॅमसनला माघारी धाडले. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरही धावबाद झाला. संजू आणि स्मिथ वगळता इतर कोणत्याच फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. तर, चेन्नईकडून सॅम करननं 2 विकेट घेतल्या. चेन्नईकडून पियूष चावला सर्वात महागडा गोलंदाज ठरला. चावलानं 4 ओव्हरमध्ये 55 धावा दिल्या.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड मिलर, रियान पराग, श्रेयस गोपाळ, टॉम कुरन, राहुल तेवातिया, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट.

चेन्नई सुपर किंग्स : मुरली विजय, शेन वॉट्सन, फाफ ड्यु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, सॅम करन, दीपक चाहर, पियुष चावला, लुंगी नग्धी.

Published by: Priyanka Gawde
First published: September 22, 2020, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading