शारजाह, 22 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामातील चौथा सामना आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. हा सामना शारजाहच्या मैदानावर सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. मात्र त्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाचा मोठा झटका बसला आहे. राजस्थान संघातील दोन स्टार खेळाडू पहिला सामना खेळणार नाही आहे.
राजस्थान संघातील अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि विकेटकीपर जोस बटलर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिला सामना खेळू शकणार नाही आहेत. जोस बटलरला युएइमध्ये क्वारंटाइन करण्यात आल्यामुळे तो पहिला सामना खेळणार नसल्याचे स्वत: सांगितले. तर, स्टार खेळाडू बेन स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सर झाल्यामुळे बेन सध्या आपल्या कुटुंबासोबत राहणार आहे. त्यामुळे तो पहिला सामना खेळणार नाही आहे.
याआधी राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ देखील दुखापतग्रस्त झाला होता. मात्र स्मिथ खेळणार असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघानं मुंबईला हरवले होते. चेन्नईकडून अंबाती रायडू आणि फाफ ड्यु प्लेसिस यांनी चांगली कामगिरी केली होती.
तर, दुसरीकडे रॉयल्सची कामगिरी मुख्यत्वे परदेशी खेळाडूंवर असते. गोलंदाजीत इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि ऑस्ट्रेलियाचा अॅन्ड्र्यू टाय यांच्यावर जबाबदारी असेल. तर, फलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरवर सर्वांच्या नजरा असतील. त्याचबरोबर संघात संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, वरुण अॅरॉन असे भारतीय खेळाडूही आहेत, ज्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जॉस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशाने थॉमस, अॅंड्रयू टाय, डेव्हिड मिलर, टॉम कुरेन, अनिरूद्ध जोशी, श्रेयस गोपाल, रियान पराग, वरुण अॅरॉन, शशांक सिंह, अनुज रावत,महिपाल लोमरोर, मयंक मार्कंडे.
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ ड्यू प्लेसीस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्व्हेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एंगिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिचेल सेंटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम कुरन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साइ किशोर, ऋतुराज गायकवाड़, कर्ण शर्मा.