अबु धाबी, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या बैंगलोर (Royal Challengers Bangalore)विरुद्धच्या सामन्यात राजस्थान (Rajasthan Royals)च्या बॅटिंगला संघर्ष करावा लागला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या राजस्थानच्या टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 20 ओव्हरमध्ये राजस्थानचा स्कोअर 154/6 एवढा झाला आहे. राजस्थानकडून यंदाच्या मोसमात पहिलीच मॅच खेळणाऱ्या महिपाल लोमरोरने सर्वाधिक 47 रन केले. राहुल टेवटियाने 12 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 24 रन आणि जोफ्रा आर्चरने 10 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 16 रनमुळे राजस्थानला 150 रनचा टप्पा गाठता आला. बैंगलोरकडून युझवेंद्र चहलने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर इसरू उडानाला 2 आणि नवदीप सैनीला 1 विकेट मिळाली.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली ही पहिलीच दुपारची मॅच आहे. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम पाचव्या आणि बैंगलोरची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही टीमनी आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये विजय मिळवला आहे आणि 1 मॅचमध्ये पराभव पत्करला आहे. नेट रनरेट चांगला असल्यामुळे राजस्थानची टीम बैंगलोरच्या पुढे आहे. आजची मॅच जिंकलेली टीम पॉईंट्स टेबलमध्ये थेट पहिल्या क्रमांकावर जाईल.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.